मुंबई

युनियन क्रिकेट अकॅडमीचा हॅटट्रिक विजय

CD

युनियन क्रिकेट अकॅडमीची विजयाची हॅट्‍ ट्रिक
सलग तिसऱ्यांदा शताब्दी ट्रॉफीवर कोरले नाव
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : स्पोर्टिंग क्रिकेट क्लब, ठाणे यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या सत्रातील शताब्दी निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन क्रिकेट अकॅडमीने पुन्हा एकदा आपली विजयी परंपरा राखत इतिहास रचला आहे. त्यांनी पहिल्या डावाच्या आघाडीच्या आधारे विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा शताब्दी ट्रॉफीवर आपली मोहर उमटवली आहे.
सामन्याची सुरुवात युनियन क्रिकेट अकॅडमीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२५ धावा केल्या. अथर्व गवाडे (वय ५२) आणि हिर्धान गंभीर (वय ४१) यांनी संघासाठी महत्त्वाची खेळी केली. युनियनच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि नेमक्या शैलीचा उत्कृष्ट नमुना दाखवला. कुंज पटेलने २३ षटकांत नऊ षटके निर्धाव टाकत ३६ धावांत चार बळी घेतले. तर प्रशांत अल्लूने २३.२ षटकांत ४७ धावांत तीन बळी घेत प्रतिस्पर्ध्यांना रोखून धरले.
उत्तरादाखलच्या डावात युनियन क्रिकेट अकॅडमीची सुरुवात डळमळीत झाली. केवळ ४१ धावांवर तीन फलंदाज बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. मात्र सनमित कोथमिरे आणि सिद्धांत सिंग यांनी संयम आणि चिकाटीच्या बळावर डाव सावरला. दोघांनी मिळून १५० धावांची भक्कम भागीदारी करीत संघाला विजयी स्थितीत आणले. संघाच्या या ऐतिहासिक विजयात प्रशिक्षक किशन पांडे यांच्या मार्गदर्शनाचा आणि खेळाडूंच्या शैलीचा मोठा वाटा राहिला. पांडे यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाला प्रेरणादायी नेतृत्व दिले.

नायक ठरला सनमित कोथमिरे
सनमित कोथमिरेने आत्मविश्वासाने खेळ करीत नाबाद २१३ धावा फटकावल्या. ही त्याची या स्पर्धेतील दुसरी दुहेरी शतकी खेळी ठरली. सिद्धांत सिंगनेही ७७ धावांची अष्टपैलू कामगिरी केली. त्यांच्या भक्कम खेळीमुळे युनियन क्रिकेट अकॅडमीने पाच गडी गमावून ४२८ धावांचा डोंगर उभा केला आणि पहिल्या डावातील आघाडीवर विजय निश्चित केला.

एमसीएकडून कौतुक
अंतिम सामन्यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) निवडकर्ते उपस्थित होते. त्यांनी दोन्ही संघांतील तरुण खेळाडूंच्या कौशल्याचे आणि लढावू वृत्तीचे कौतुक केले. या दमदार विजयासह युनियन क्रिकेट अकॅडमीने ठाणे क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत सलग तिसऱ्यांदा शताब्दी ट्रॉफी आपल्या नावावर केली. ठाण्यातील क्रिकेटप्रेमींसाठी ही गौरवाची आणि अभिमानाची घटना ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

Delhi Blast : दिल्लीत २९ वर्षांत किती वेळा झाले स्फोट? संपूर्ण माहिती वाचा एका ठिकाणी

Delhi Blast: दिल्ली स्फोटात आठ जणांचा मृत्यू, शरीराच्या चिंधड्या उडाल्या, डझनभर गाड्या जळून खाक; जखमींचा आकडा मोठा, नेमकं काय घडलं?

Delhi Red Fort blast Live Update : गृहमंत्री अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

SCROLL FOR NEXT