मुंबई

धापडी शेतीत वालाची हिरवाई

CD

धापडी शेतीत वालाची हिरवाई
अवेळी पावसाचा फायदा; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
तळा, ता. १० (बातमीदार) ः तळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी भाताची कापणी लवकर केल्यामुळे त्यांच्या धापडी शेतीत आता वाल पिकाचे हिरवेगार गालिचे पसरलेले दिसून येत आहेत. कोकणातील शेतजमिनींवर डोलणारे वालाचे झाड आणि फुलांची रंगतदार शोभा हे दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले आहे.
या भागात अलीकडील काही दिवसांतील अवेळी पडलेला पाऊस या नव्या पिकांसाठी वरदान ठरला आहे. कमी पाण्याच्या शेतीत उभी-आडवी नांगरणी करून शेतकऱ्यांनी वाल पेरणी केली होती. पेरणीनंतर वेळेवर झालेल्या पावसामुळे या पिकांना चांगले उगव आणि पोषण मिळाले. परिणामी सध्या या शेतीत हिरवाई नटलेली असून, संपूर्ण परिसरात सुंदर दृश्य अनुभवायला मिळत आहे.
वालपीक हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. नवीन वर्षाच्या प्रारंभीच या शेतीमुळे शेतकऱ्यांना चार पैसे हातात मिळणार असल्याने त्यांचा उत्साह वाढला आहे. गेल्या वर्षी वालाच्या शेंगा किलोमागे सुमारे १२० रुपये, तर सुक्या वालाला तब्बल २२० रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षीही चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोकणातील वाल पोपटी हे पारंपरिक व लोकप्रिय खाद्यपदार्थ असून, त्याला बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. त्यामुळे या शेतीला फक्त आर्थिकच नव्हे, तर सांस्कृतिक महत्त्वदेखील लाभले आहे. लवकर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना शेंगा बाजारात लवकर आणता येतात आणि त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो.
..............
वालपीक हे कमी खर्चिक आणि जलद परतावा देणारे असून, भातानंतर घेतले जाणारे हे दुय्यम पीक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारे ठरते. तळा तालुक्यातील धापडी भागात यंदा शेकडो एकरांवर वालशेती केली गेली असून, ती सध्या फुलोऱ्यात आहे. संपूर्ण परिसरात हिरवळ पसरल्याने शेतीचे सौंदर्य खुलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Blast: खोली भाड्याने घेऊन साठवलं होतं बॉम्ब बनवण्याचं साहित्य; काही तासांपूर्वीच ३०० किलो आरडीएक्स जप्त, दिल्ली स्फोटाशी काय कनेक्शन?

Delhi Red Fort blast Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

Delhi Bomb Blast Fire Officer Video : दिल्ली स्फोटाच्या घटनास्थळी सर्वात पहिल्यांदा पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं

Delhi Blast Update : तीन वेळा जमिनीवर आपटलो, दूरपर्यंत आगीच्या ज्वाळा... दिल्ली स्पोटातील प्रत्यक्षदर्शींने सांगितला हादरवणारा प्रसंग

SCROLL FOR NEXT