मुंबई

थोडक्‍यात रायगड बातम्या

CD

स्टेट बँके नवीन वास्तूत स्थलांतर
पोयनाड (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पोयनाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे स्थलांतर नव्या प्रशस्त व आधुनिक वास्तूत करण्यात आले आहे. यापूर्वी पाराजवळील गर्दीच्या भागात असलेल्या शाखेमुळे ग्राहकांना असुविधा व वाहतूक कोंडीचा त्रास होत होता. या पार्श्वभूमीवर पेण–अलिबाग राज्य मार्गालगत आपला बाजार शेजारील इमारतीत बँकेचे नवे कार्यालय सुरू झाले आहे. १० नोव्हेंबरपासून बँकेचे कामकाज सुरू झाले असून ग्राहकांसाठी एटीएम, रोख जमा मशीन आणि अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. नवीन शाखेचा लाभ पोयनाड पंचक्रोशीसह पेझारी, शहाबाज, शहापूर, कोपर, तीनवीरा, भाकरवड, श्रीगाव, मेढेखार, तांडवागळे, कोळघर या गावांतील नागरिकांना होणार आहे. बँकेने नागरिकांना नव्या शाखेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
................
जिल्हास्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा
रोहा (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि किल्ल्यांच्या बांधणीची प्रेरणा देणारी दक्षिण रायगड जिल्हा स्तरीय किल्ला बांधणी स्पर्धा यंदा रोहा येथे उत्साहात पार पडली. शनिवारी मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी सांगितले की, यंदा मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात झाल्याने स्पर्धेला नवे रूप मिळाले. ही स्पर्धा गेली आठ वर्षांपासून अखंडपणे चालू असून यंदा रोहा, मुरूड, माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील ११५ स्पर्धक आणि ५०० सहकारी सहभागी झाले. स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये सचिन दळवी, समीर दळवी, अरुण साळुंखे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास येरुणकर यांनी केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना किल्ल्यांच्या रचना, जलव्यवस्था, अन्नसाठवण व संरक्षण तंत्र यांची माहिती मिळाली.
........
शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांमधून स्पोर्ट्समन स्पिरिट वाढले पाहिजे : संदीप तटकरे
रोहा (बातमीदार) ः शिक्षकांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकवण देणेच नव्हे, तर स्वतः मैदानावर उतरून खेळातील शिस्त, कौशल्य आणि आरोग्यदायी स्पर्धेचे उदाहरण घालून दिले पाहिजे, असे प्रतिपादन तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप तटकरे यांनी केले. रोहा तालुका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या वेळी तटकरे बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिक्षकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयीची प्रेरणा निर्माण होते. स्पर्धेचा हेतू केवळ विजय नसून, स्पोर्ट्समन स्पिरिट विकसित करणे हा आहे. या स्पर्धेत शिक्षकांनी खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळी फेक, भाला फेक आदी स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला. शिक्षकांचा फिटनेस आणि खेळातील आवड पाहून उपस्थितांनी कौतुक व्यक्त केले. कार्यक्रमास प्रकाश सर्कले, गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे, प्राचार्य संतोषकुमार भालेराव, योगिनी देशमुख, क्रीडा समन्वयक रवींद्र कान्हेकर, तसेच पंच आणि केंद्रप्रमुख उपस्थित होते. या स्पर्धांमुळे शिक्षकांमधील आत्मविश्वास, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना वृद्धिंगत झाल्याचे सर्वांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT