मुंबई

मालाडमध्ये बांधकाम साईटवर मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

CD

बांधकामाच्या ठिकाणावर मजुराचा मृत्यू
मालाड, ता. १० (बातमीदार) ः मालाड पूर्वेतील शांतीनगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी सोमवारी (ता. १०) दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास आठव्या मजल्‍यावरून पडून मजुराचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली. इशराफूल असे मृत मजुराचे नाव आहे. दिंडोशी पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत मजुराला सहकाऱ्यांनी तत्काळ रुग्णवाहिकेने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. ही दुर्घटना घडल्यानंतर कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फक्त एका आठवड्यात मालाड पूर्व व पश्चिम भागात दोन वेगवेगळ्या बांधकामाच्या ठिकाणी दोन मजुरांचा मृत्यू झाल्याने बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मालाड पश्‍चिमेत वलनई येथेही एका मजुराचा मृत्‍यू झाला होता. विकसकाकडून सुरक्षितता नियमांची पायमल्ली होत असल्‍याने अशा घटना घडत असल्‍याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, पण कारवाई मात्र होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राम भोईटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT