मुंबई

श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी मनसे मैदानात

CD

श्रीवर्धन नगर परिषदेसाठी मनसे मैदानात
श्रीवर्धन‌, ता. १० (वार्ताहर) : श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकासाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (ता. १०) पहिला दिवस असल्याने इच्छुक उमेदवार नगर परिषद कार्यालयात कागदपत्रे व इतर माहिती घेण्यासाठी फेरफटका मारताना दिसले. दरम्यान, कोणत्याही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही. या वेळी मनसेही नगर परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरत असून, मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते नगर परिषद कार्यालय येथे जमल्याने समीकरण बदलणार अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.
श्रीवर्धन तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काही ग्रामपंचायतींवर मनसेने उमेदवार उभे केले होते. यापैकी चिखलप ग्रामपंचायतीवर एक सदस्य विजयी झाल्याने मनसेने तालुक्यात खाते उघडले. आता मनसेचे लक्ष्य नगर परिषद असून, त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. जनतेमधून नगराध्यक्ष निवड आणि १० प्रभागांतून प्रत्येकी दोन असे २० उमेदवार रिंगणात उतरवायचे या बाबतीत विद्यार्थी तालुका अध्यक्ष ओमकार चोगले यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या वेळी दक्षिण रायगड उप जिल्हाध्यक्ष मृदास तोंडलेकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश लोहार, शहर अध्यक्ष रूपेश मयेकर, माजी शहर अध्यक्ष संकेत भाटकर, विद्यार्थी शहर अध्यक्ष श्रीवर्धन हितेश चौले, मनसे सचिव सुमित सावंत व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT