मुंबई

बेलापूर विभाग कार्यालयात ५७ मतदार

CD

बेलापूर विभाग कार्यालयात ५७ मतदार
निवडणूक आयोगाविरोधात नवी मुंबईत मनसे आक्रमक
तुर्भे, ता. १० (बातमीदार): नवी मुंबईतील मतदार याद्यांमधील मतदारांच्या नोंदणीचा घोळ अजूनही कायम आहे. सुलभ शौचालय, पाम बीच रस्ता तसेच नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या नेरूळ येथील अधिकृत निवासस्थानी मतदारांची नोंद झाल्यानंतर ५७ मतदारांच्या घर क्रमांक/पत्ता बेलापूर विभाग कार्यालय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराने निवडणूक आयोगाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार मतदार नोंदणी प्रक्रियाही गतिमान झाली असली तरी, नवी मुंबईत सातत्याने अनियमितता होत आहे. बेलापूर विभाग कार्यालयाच्या पत्त्यावर तब्बल ५७ मतदारांची नोंद झाली आहे. यातील बहुसंख्य मतदार अमराठी आणि परराज्यातील आहेत. त्यामुळे बोगस मतदारांच्या नोंदणीचा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
---------------------------------
विशेष शोधमोहीम
मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी शिष्टमंडळासह सोमवारी (ता.१०) बेलापूर प्रभाग कार्यालयाला भेट दिली. या वेळी मतदारांची शोधमोहीम घेताना कार्यकर्त्यांनी विभाग कार्यालयामधील सुरक्षा रक्षक, कर्मचारी, लिपिक यांच्याकडे विचारणा केली. तसेच लवकरच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
-----------------------
या मतदारांची निवडणूक अधिकाऱ्यांनी झोपेत नोंदणी केली असल्याचे दिसत आहे. रोज नवनवीन प्रताप समोर येत असल्याने अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला जाणार आहे.
- गजानन काळे, प्रवक्ता, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT