मुंबई

धारावीतील कचरा उचलण्यास सुरुवात

CD

धारावीतील कचरा उचलण्यास सुरुवात
धारावी, ता. १० (बातमीदार) : धारावीतील विविध विभागांतील अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होेते. याबाबत ‘सकाळ’च्या ३ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत पालिकेने कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे.
भरदिवाळीतही अनेक रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. रस्त्यावर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याचे संकलन करण्याचे नियोजन विस्कळित झाले होते. यामुळे ठिकठिकाणी कचरा दिसून येत होता. पालिकेने कार्यवाहीस सुरुवात केल्‍याने धारावीतील अनेक अंतर्गत रस्ते स्वच्छ व चकाचक दिसू लागले आहेत. त्‍यामुळे स्थानिक रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत. कचरा टाकलेल्या रस्त्यांवरून जाताना पादचाऱ्यांना नाकाला रुमाल लावूनच जावे लागत होते. पालिकेची कचरा संकलन करणारी वाहने मर्यादित आहेत. त्‍यामुळे जमलेला कचरा उचलण्यास दिरंगाई होत होती. धारावीतील कचऱ्याच्या प्रश्नी राजकीय पक्षांनी वारंवार आंदोलने केली आहेत, तर सामाजिक संघटनांनी पालिकेसोबत पत्रव्यवहार करून याप्रश्नी पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही धारावीतील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. कचऱ्यामुळे धारावीतील बकालपणा वाढत चालला होता. पालिका प्रशासनाने वाढत चाललेल्या कचरा प्रश्नावर गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

१९ वर्षांपूर्वी सुरू झालेली चर्चा, आता निर्णय; भारत EU व्यापारी करारावर आज होणार शिक्कामोर्तब

IND vs NZ : न्यूझीलंडने 'वर्ल्ड रेकॉर्ड' होल्डर फलंदाज बोलावला, अभिषेक शर्माला देणार टक्कर; शेवटच्या २ सामन्यांसाठी संघ बदलला

Latest Marathi News Live Update : कुडाळ पणदूर तिठा येथे हार्डवेअर दुकानाला भीषण आग

Supreme Court मानवी हक्कांच्या रक्षणासाठी; केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर नाराजी? न्यायमूर्तींच्या विधानामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT