मुंबई

नाकातील पिना घेण्यासाठी आलेल्या महिलांनी सोनाराला लुबाडले

CD

महिला टोळीने सोनाराला लुबाडले
१८ कॅरेट सोन्याचे ६५ नग घेऊन पोबारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : सोन्याच्या नाकातील पिना खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या तीन महिलांनी सोनाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या महिलांनी हातचलाखीने एक लाख दोन हजार रुपये किंमतीचे १०.२०० ग्रॅम वजनाचे १८ कॅरेट सोन्याचे ६५ नग घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात त्या महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार रवींद्र सरफळे (वय ५०) यांचे खोपट, हंसनगर येथे श्री शिव समर्थ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १ नोव्हेंबर रोजी ६० ते ६५ वर्षीय तीन महिला कानातील चमकी विकत घेण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी त्यांना सोन्याच्या पीना दाखवत असताना त्यांनी गोंधळ घातला. पिनाचे पाकीट उचलून हातात घेत होत्या. त्या महिलांनी हातचलाखीने सोन्याच्या पिनांची पाकीटे नकळत त्यांच्या साडीमध्ये लपवत पोबारा केला. रवींद्र सरफळे हे त्यांच्या दुकानातील स्टॉक चेक करित असताना त्यांना १०.२०० ग्रॅम वजनाचे १८ कॅरेट सोन्याचे ६५ नगाचे पाकीट मिळून आले नाही. म्हणून त्यांनी दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी त्यांनी रविवारी (ता. ९) पोलिस ठाण्यात धाव घेत झालेल्या चोरीप्रकरणी तक्रार दिल्यानंतर त्या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नौपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bhagoria Festival : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT