मुंबई

कोंडीमुक्त घोडबंदरसाठी फेब्रुवारी उजाणार सुधारीत

CD

कोंडीमुक्त घोडबंदरचे स्वप्न पुढच्या वर्षी साकारणार!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : डिसेंबरअखेरपर्यंत सेवा रस्ता विलीनीकरण करून घोडबंदर मार्ग कोंडीमुक्त करण्याचे स्वप्न आणखी दोन महिने पुढे सरकले आहे. गायमुख घाटाचे पुनर्पुष्ठीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात जानेवारी २०२६मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक सोमवारी झाली. ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त आस्तिक कुमार पाण्ड्ये, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलिस उपायुक्त (वाहतुक) पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा इत्यादी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जस्टिस फॉर घोडबंदर रोड यांचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते.
घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत ‘जस्टिस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले. त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली. गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्ठीकरणाचे काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे. त्याचवेळी ‘जस्टिस फॉर घोडबंदर रोड’च्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलांवरील रस्त्याची डागडुजी, पुनर्पुष्ठीकरण एकाचवेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
-----
गायमुख येणार पालिकेच्या ताब्यात
गायमुख घाटाच्या पुनर्पुष्ठीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोडबंदर रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठाणे महापालिकेला दिले आहेत.
----
ठळक मुद्दे
१. कापूरबावडी ते गायमुख या १०.५० किमी अंतरावरील रस्त्याचे काम ५६० कोटींच्या प्रकल्पांतर्गत सुरू आहे.
२. या कामासाठी २,१९६ झाडांची कत्तल करण्यात आली असून, विद्युत पोल व वीज वाहिन्यांचे बदल करण्यासाठी ७० कोटींचा खर्च होणार आहे.
३. वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील अनेक ठिकाणी एकच लेन सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
४ रात्री ३ नंतर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे गायमुख घाटात कोंडी होत आहे. सकाळी ८ ते ९ वाजता कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना केली जात आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT