मुंबई

खोणीतील अडीच हजार रहिवाशांचा रस्त्यावर एल्गार

CD

अडीच हजार रहिवाशांचा रस्त्यावर एल्गार
खोणीतील दुहेरी देखभाल शुल्क रद्द करण्याच्या मागणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः सोसायटी स्थापन होऊन दोन वर्षे उलटली, तरीही विकसक सोसायटीतील रहिवाशांकडून दरमहा मनमानी शुल्क आकारत आहे. यामुळे पलावा, खोणी, तळोजा येथील रहिवाशांनी रविवारी (ता. १०) रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. क्राऊन प्रकल्पापासून विकसकाच्या कार्यालयापर्यंत भरउन्हात काढण्यात आलेल्या या मूक मोर्चादरम्यान रहिवाशांनी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. तरीही तोडगा न निघाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा रहिवाशांनी दिला.
खोणी, तळोजा येथे विविध गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यापैकी ऑर्किड सोसायटीत सुमारे दोन हजार ५०० घरे असून, ती सर्वात मोठ्या सोसायट्यांपैकी एक मानली जाते. या सोसायटीचा ताबा रहिवाशांकडे जाऊन दोन वर्षे उलटली आहेत. तरीही विकसक कंपनी रहिवाशांकडून देखभाल शुल्क आकारत आहे, शिवाय सोसायटीमार्फतही स्वतंत्र शुल्क घेतले जात असल्याने रहिवाशांवर दुहेरी आर्थिक भार पडत आहे. दोन ठिकाणांहून वेगवेगळे शुल्क भरून आमचे कंबरडे मोडले आहे. आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवासी आहोत. घरांवर आधीच कर्जाच्या हप्त्यांचा बोजा आहे. आता दरमहा दोन ठिकाणांहून शुल्कच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याने आमच्या कष्टाच्या कमाईची लूट सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. याविरोधात रविवारी सकाळी रहिवाशांनी एकत्र येऊन शांततेत मूक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.

उपोषणाचे हत्यार
येत्या १५ दिवसांत तोडगा काढा अन्यथा आंदोलन चिघळणार असल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. हकनाक आकारले जाणारे शुल्क बंद करावे अन्यथा त्याचे परिणाम दिसून येतील. दिलेल्या मुदतीत जर का तोडगा न काढल्यास आम्हाला उपोषणाचे हत्यार उपसावे लागणार असल्याचेही मोर्चेकरी रहिवाशांनी म्हटले आहे.

महारेराकडे दाद मागणार
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंबरे आणि सोसायटीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, संबंधित विकसकाकडून मनमानी वसुली सुरू आहे. अन्यायकारक वसुलीला विरोध करणे, हा आमचा अधिकार आहे. महारेराकडेही आम्ही यासंदर्भात दाद मागणार आहोत, असेही ठोंबरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

Delhi Red Fort blast Live Update : पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांबाबत व्यक्त केला शोक अन् जखमींसाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT