मुंबई

तिघांचा बळी, मृतांमध्ये महिला वकिलाचा समावेश

CD

तीन अपघातांत तिघांचा मृत्यू

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : कळंबोली, तळोजा आणि सीवूड्स परिसरात तीन अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. रविवारी हे अपघात घडले असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
पहिला अपघात कळंबोली परिसरात रविवारी सकाळी घडला. अनिता सरफरे (४२, रा. वरळी कोळीवाडा) पतीसह मोटारसायकलवरून अलिबाग येथील आजारी वडिलांना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. सायन-पनवेल महामार्गावरील पेट्रोलपंपाजवळ भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात अनिता सरफरे गंभीर जखमी झाल्या. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी डंपरचालक छोटन यादव (३७) याला अटक केली आहे.
दुसरा अपघात तळोजा येथील नावडे गावासमोरील रस्त्यावर घडला. रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने पादचारी मिलिंद भिकाजी सुरडकर (वय ५५) यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक पसार झाला.
तिसरा अपघात रविवारी रात्री सीवूड्स रेल्वे ब्रिजजवळ घडला. करावे गावात राहणारा प्रदीप अशोक सोलंकी (वय २८) हा आपल्या बुलेटवरून करावे गावाकडे जात असताना सावळा चौकाजवळ भरधाव स्कूटीने त्याला धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी स्कूटीचालक यज्ञेश्वर रमेश कोळी (वय ३८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

Latest Marathi News Live Update : सत्तासंघर्षाची सुनावणी निश्चित वेळेवर होईल की नाही, हे ठरलं नाही; सुनावणी पुढे जाईल असीम सरोदे यांना विश्वास

Stock Market Today: शेअर बाजार लाल रंगात बंद! मोठी घसरण झाली तरी हे स्टॉक मात्र वाढले

इराण-इस्रायल तणावात सोन्याच्या किमती घसरल्या; खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे का? तज्ञांनी उत्तर देत गुंतवणूकदारांचा प्रश्नच सोडवला!

SCROLL FOR NEXT