मुंबई

पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरण

CD

पल्लवी पूरकायस्थ हत्या प्रकरण 
----
मारेकरी सज्जाद मुघलची जन्मठेप कायम 
राज्य सरकारची फाशीची मागणी न्यायालयाने फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : वडाळा येथील ‘हिमालयन हाइट्स’मधील पल्लवी पूरकायस्थ (वय २५) या वकील तरुणीच्या २०१२मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातील आरोपी सज्जाद मुघलला सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १०) कायम ठेवली. सज्जादला जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी करणारी राज्य सरकार आणि पल्लवीच्या वडिलांची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. 
पल्लवीची हत्या सज्जादनेच केल्याचा आरोप सरकारी पक्षाने सिद्ध केला आहे. सत्र न्यायालयाने ठोस निर्णय दिल्याने त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने नोंदवले. तथापि सज्जाद हा आधी फरार होता आणि पाकिस्तान सीमेजवळून त्यास पुन्हा अटक केली होती. सज्जादचे वर्तन लक्षात घेता त्याला पॅरोल किंवा फर्लोचा अधिकार नसेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.   खटल्यातील तथ्ये आणि साक्षीदारांच्या साक्षींमुळे सज्जादने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे. घटनेतील पुरावे लक्षात घेता, तो निर्दोष असल्याचा कोणताही आधार नसल्याचे अधोरेखित करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.  
----
प्रकरण काय ?
पल्लवीचा ९ ऑगस्ट २०१२ रोजी वडाळ्यातील घरात मृतदेह आढळला होता. सोसायटीतील सुरक्षा रक्षक सज्जादने तिच्या घरातील वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर तिच्या घरात घुसून विनयभंग केल्यानंतर तिचा खून केला. सत्र न्यायालयाने जुलै २०१४मध्ये सज्जादला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीत मोडत नसल्याचे नमूद करून सज्जादला फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने २०१५मध्ये उच्च न्यायालयात अपील, तर वडिलांनी फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पुनर्विचार याचिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT