मुंबई

शिवसेनेचा भगवा प्रत्येक नगरपालिकेवर फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CD

प्रत्येक भगवा नगरपालिकेवर फडकणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : राज्यातील विविध १६ विभागांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. “आजच्या या महाशक्ती प्रवेशामुळे शिवसेना आणखी बळकट झाली आहे. येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येक नगरपालिकेवर भगवा फडकणार,” असा आत्मविश्वास या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
“महाविकास आघाडीच्या काळात विकासाला स्पीड ब्रेकर बसले होते, पण आता विकासाचे इंजिन पुन्हा वेगात धावत आहे,” असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती आणि विविध कल्याणकारी योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी ठरत आहेत. आम्ही दिलेला शब्द पाळतो; सबबी देत नाही,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा प्रवक्ता डॉ. संजय लाखे पाटील, धुळे येथील नगरसेवक जितेंद्र जगताप, शहर संघटक विनोद जगताप, धुळ्याचे माजी सभापती वसंत पावरा, मनसे माथाडी उपाध्यक्ष प्रथमेश चव्हाण, अमित जंगम (रायगड), गोपीनाथ संसारे, मातंग समाज मुंबई अध्यक्ष विकी जाधव, शमशुद्दीन शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. विकास, विश्वास आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी हीच खरी जनतेची शिवसेना आहे,” असे सांगत शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

SCROLL FOR NEXT