मुंबई

‘शिवशाही’ला हवेत ‘एसआरए’ प्रकल्प

CD

‘शिवशाही’ला हवेत ‘एसआरए’ प्रकल्प
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई शहरासह उपनगरांतील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हे प्रकल्प एसआरए प्राधिकरणाकडून एमएमआरडीए, म्हाडा, महापालिका अशा विविध आस्थापनांना दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवशाही पुनर्वसन प्रकल्पही रखडलेले एसआरए प्रकल्प हवे आहेत. त्यासाठी शिवशाहीने एसआरए प्राधिकरणाला पत्र दिले असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे एसआरए काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, हे प्रकल्प मिळाल्यास ते पूर्ण करण्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी असल्याचे शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महानगरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील जवळपास ६०० हून अधिक एसआरए प्रकल्प १० वर्षांहून अधिक काळापासून रखडलेले आहेत. त्यामुळे हजारो झोपडपट्टीवासीय पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही ठिकाणी पुनर्विकास अर्धवट रखडलेला आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसआरए प्राधिकरणाने एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, महाहाउसिंग, महाप्रित, एमआयडीसी, मुंबई महापालिका यांना संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविण्याची मान्यता दिली असून, त्याबाबतची कार्यवाही केली आहे. त्याच धर्तीवर ‘शिवशाही’नेही हे पुनर्वसन प्रकल्प आम्हाला देण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र त्याबाबत एसआरएकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची १९९८ मध्ये मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने स्थापना केली होती. त्यानुसार दादर येथे पहिला पुनर्विकास प्रकल्प शिवशाहीने राबवला होता. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी एसआरए प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच सध्या पुरेसा निधी उपलब्ध आहे. त्याआधारेच त्यांनी प्रकल्पाची मागणी केली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT