मुंबई

मीटर सेवेबरोबरच शेअरिंगची सुविधा

CD

विरार, ता. ११ (बातमीदार) : वसई परिसरातील रिक्षा वाहतूक व्यवस्थेबाबत सोमवारी (ता. १०) वसई-विरार महापालिका मुख्यालयात आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. शहरात रिक्षा मीटरचे ठरलेले दर तसेच लागू राहतील. शेअरिंग रिक्षा सेवा बंद होणार नाही, परंतु प्रवाशांना स्वतःच्या इच्छेनुसार मीटर किंवा शेअरिंग या दोन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडता येईल. कोणत्याही प्रवाशावर किंवा रिक्षाचालकावर दबाव आणू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

नागरिकांची गैरसोय कमी करणे, रिक्षा सेवेत पारदर्शकता आणणे आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. मीटर प्रणाली व्यवस्थितपणे कार्यान्वित राहावी, यासाठी १० ते १५ सदस्यीय समिती स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये संघटनेचा प्रमुख, ज्येष्ठ रिक्षाचालक आणि महापालिका अधिकारी यांचा समावेश असेल. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील. तसेच, २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष सभा आयोजित करून रिक्षा व्यवस्थेतील समस्या व त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे. अनधिकृत रिक्षा, टमटम, खासगी बस आणि टँकर यांच्यावर कठोर कारवाईसाठी टास्क फोर्स नेमण्यात येईल. महापालिकेकडून २५६ रिक्षा स्टॅण्डचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ११८ स्टॅण्डची उभारणी पूर्ण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT