मुंबई

बैल बाजार चौक परिसरात अपघात

CD

बैल बाजार चौकात टेम्पोचा अपघात
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : बैल बाजार चौक परिसरात बुधवारी (ता. १२) मध्यरात्री एकच्या सुमारास एका छोट्या टेम्पोचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, टेम्पोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा टेम्पो थेट एका दुकानात घुसला. या दरम्यान रस्त्यावरील एका हातगाडीलाही या वाहनाने धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अपघातानंतर टेम्पोचा चालक अल्पवयीन असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे बैल बाजार चौक परिसरात काही काळासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

अपघाताच्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी काही वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवतात, तर अनेकदा वाहनांचे स्टेअरिंग अल्पवयीन मुलांच्या हाती दिले जाते. यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडतात आणि त्यात जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा बेजबाबदार वाहनचालकांची पोलिसांनी काटेकोरपणे तपासणी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

SCROLL FOR NEXT