आंतरराष्ट्रीय मानव हालचाल विज्ञान परिषदेला प्रतिसाद
हालचालींच्या अभावामुळे वाढणाऱ्या आजारांवर चिंतन
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे ‘मूव्ह फॉर हेल्थ’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय मानव हालचाल विज्ञान परिषद २०२५ नुकतीच वाशी येथील एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वीपणे पार पडली. ही परिषद एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथरपीच्या एमजीएम सेंटर ऑफ ह्युमन मूव्हमेंट सायन्सेसच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत भारतासह विविध देशांतील नामवंत वैज्ञानिक, चिकित्सक, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक सहभागी झाले होते. दैनंदिन जीवनातील हालचालींचे महत्त्व, क्रीडा क्षेत्रातील कार्यक्षमता, नृत्यशास्त्र, रुग्णांचे पुनर्वसन, इजा प्रतिबंधक उपाय आणि हालचालींमधील तंत्रज्ञानाधारित नवकल्पना या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. परिषदेचे उद्घाटन प्रा. डॉ. भूषण पटवर्धन (आयुष्य इंडिया लीडर, डब्ल्यूएचओ ग्लोबल ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर व यूजीसी माजी उपाध्यक्ष) यांच्या हस्ते झाले. तसेच डॉ. संजय मिश्रा (विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ सल्लागार), कुलगुरू डॉ. शशांक दळवी, आणि डॉ. रजनी मुल्लरपटन (विभागप्रमुख, फिजिओथेरपी) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. डॉ. भूषण पटवर्धन यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले, की आपल्या रोजच्या जीवनातील हालचाली जसे स्वयंपाकघरापासून शेतातल्या कामापर्यंत आता कमी होत चालल्या आहेत. याच हालचालींच्या अभावामुळे असंसर्गजन्य आजार झपाट्याने वाढत आहेत. या आजारांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर केवळ औषधोपचार नव्हे, तर जीवनशैलीत हालचालींची पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे. तसेच डॉ. संजय मिश्रा यांनी अभियांत्रिकी आणि आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधन एकत्र आणण्याची गरज व्यक्त केली, तर डॉ. अरुण सप्रे यांनी पुनर्वसन अभियांत्रिकी क्षेत्रात मानव हालचाल विज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो, यावर मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.