मुंबई

बेस्टच्या १,६८१ कर्मचाऱ्यांपैकी ३५३ कर्मचाऱ्यांनी मधुमेहातून मुक्त बेस्टच्या १,६८१ कर्मचाऱ्यांपैकी ३५३ कर्मचाऱ्यांनी मधुमेहातून मुक्त बेस्टच्या १,६८१ कर्मचाऱ्यांपैकी ३५३ कर्मचारी मधुमेहातून मुक्त

CD

बेस्टचे ३५३ कर्मचारी मधुमेहातून मुक्त
डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामची आरोग्य क्रांती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महाराष्ट्रात पाच वर्षांपूर्वी सुरू झालेलाल ‘डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम’ आता बेस्ट उपक्रमाची सर्वात मोठी आरोग्य क्रांती बनला आहे. सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे या कार्यक्रमाने हे सिद्ध केले, की मधुमेहावर विजय केवळ औषधोपचारानेच नव्हे तर शिस्तबद्ध जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारेदेखील शक्य आहे.
बेस्टच्या वैद्यकीय विभागाच्या या उपक्रमांतर्गत एक हजार ६८१ कर्मचाऱ्यांनी निरोगी जीवनासाठी नवीन सूत्र स्वीकारले आहे. त्यापैकी ३५३ कर्मचाऱ्यांनी मधुमेहाची औषधे पूर्णपणे सोडून दिली आहेत. औषधोपचार खर्च ३० लाख रुपयांवरून फक्त पाच लाख रुपयांवर आल्याची माहिती बेस्टने दिली आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १० टक्के किंवा अंदाजे १४ कोटी भारतीय या विळख्यात आहेत. हा आकडा २०३० पर्यंत दुप्पट होण्याचा अंदाज आहे. देशात दररोज ९५७ लोक मधुमेहाशी संबंधित आजाराने मृत्युमुखी पडतात. या वाढत्या धोक्यामागील मुख्य कारण म्हणजे अनियमित खाण्याच्या सवयी, जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, मद्यपान आणि तंबाखू सेवन.
.............................
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिठाई विषासारखी असते, तरीही लोक मिठाई खातात आणि साखर कमी करणाऱ्या गोळ्या घेतात. एकीकडे मिठाई आणि दुसरीकडे औषध हे दुहेरी विष आहे. लोक औषधांच्या दीर्घकालीन दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात. उपचार अनेकदा रोगापेक्षा जास्त हानिकारक ठरतात.
- डॉ. अनिल कुमार सिंघल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बेस्ट
..............................
रुग्णांचे आयुर्मान घटले
हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे आणि कर्करोग यांसारख्या आजारांच्या वाढीमागे मधुमेह हा सामान्य घटक आहे. आजारांमुळे केवळ आर्थिक भार वाढतोच, शिवाय रुग्णांचे आयुष्य सरासरी ७ ते १० वर्षे कमी होते. या कार्यक्रमांतर्गत ५ ते २० वर्षांपासून मधुमेह असलेल्या ३५३ बेस्ट कर्मचाऱ्यांपैकी बरेच जण आता कोणत्याही औषधावर नाहीत. याव्यतिरिक्त ५०० कर्मचाऱ्यांच्या औषधोपचाराच्या गरजांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. हृदयरोग आणि क्षयरोग यांसारख्या मधुमेहाशी संबंधित आजार आणि मृत्युदरदेखील लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असेही सिंघल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Bihar Election Result 2025 Live Updates : वैशाली जिल्ह्यातील कोणत्या जागेवर कोणी विजय मिळवला?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

मोदींची ‘गमछा सिग्नेचर स्टाईल’ परत एकदा चर्चेत! बिहार निकालानंतर अनोखा अंदाज व्हायरल, ‘गमछा वेव्ह’चा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंग

Latest Live Update News Marathi: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत

SCROLL FOR NEXT