मुंबई

सरकारी कब्रस्तानची जमीन फसवणूक करून विक्री,१२ जणांविरोधात गुन्हा दाखल

CD

सरकारी जमीन विकणाऱ्या
१२ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) ः भिवंडी पालिकेडून कब्रस्तानासाठी आरक्षित जमीन परस्पर खरेदीखत करून विकली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गौरीपाडा येथील सर्व्हे क्रमांक ७० ही शासकीय कब्रस्तान म्हणून आरक्षित आहे. जमीन कब्रस्तान या वर्गवारीतील असल्याचे माहीत असतानाही आपल्या मालकीची व कब्जात असल्याचे सांगत २७ एप्रिल ते १९७६ पासून आजपर्यंत खरेदी- विक्री करून फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार मिल्यावर महसूल विभागामार्फत सखोल चौकशी करून मंडळ अधिकारी शैलेश भोजने यांनी दिलेल्या तक्रारीवरून केशव तुकाराम टावरे, मोतीराम तुकाराम टावरे, गणपत तुकाराम टावरे, बळीराम तुकाराम टावरे, श्रीमती बबई धर्माजी पाटील, श्रीमती बारकुबाई महादेव केणे, श्रीमती चांगुणाबाई तुकाराम टावरे सर्व रा. भोईवाडा, मोहम्मद कासीम समरु, फैय्याज अहमद मोहम्मद ताहीर, अब्दुल गणी मोहम्मद सरदार, मोहम्मद हनीफ ताहीर, मौलाना मोह हुसेन असलमी या १२ जणांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

FIFA World Cup अमेरिकेत! इराणची माघार की बंदी? स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : इराण-इजरायल युद्धावरून सोलापुरात राजकीय वातावरण तापलं

डोनाल्ड ट्रम्प यांनी कल्पनाही केली नसेल... अमेरिकेच्या तिजोरीला जबरदस्त धक्का, इराणविरुद्धच्या मोहिमेत किती खर्च?

SCROLL FOR NEXT