मुंबई

पनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा

CD

गाढी नदीवर नवा पूल; पनवेल-करंजाडे वाहतुकीला नवा श्वास
पनवेल-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग सुलभ होणार
४८.४० कोटींचा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेनंतर गतिमान

पनवेल, ता. १४ ( बातमीदार) ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिसरातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रहदारीचा वाढता ताण लक्षात घेता गाढी नदीवर नवीन पूल उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला प्रशासकीय महासभेत मंजुरी देण्यात आली.
पूल उभारणीची मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी केली होती. विमानतळाकडे जाण्यासाठी करंजाडे, वडघर तसेच सिडको वसाहती हा महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. मात्र सध्या असलेला पूल अरुंद आहे. वाढत्या वाहन भाराने तो वारंवार कोंडीत सापडतो. विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अनेक पटींनी वाढणार असल्याने नवीन पूल उभारणे अत्यावश्यक बनले होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल-करंजाडे मार्गाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. गाढी नदीवरील हा नवा पूल केवळ वाहतूक प्रकल्प नसून, विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीला चालना देणारा महत्त्वाचा घटक ठरणार आहे.

चौकट
विमानतळाकडे जाणारा प्रवास होणार वेगवान
पनवेल-करंजाडे मार्गावर उभारला जाणारा हा पूल विमानतळाच्या प्रवेशद्वारापर्यंत सहज पोहोचण्यासाठी महत्त्वाची जोडणी निर्माण करणार आहे. ४ लेनचा, २४० मीटर लांबीचा आणि २१.५ मीटर रुंदीचा हा पूल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास विमानतळाकडे जाणारी वाहतूक थेट विभाजित होऊन सुरळीत होणार आहे. पूर्वेकडील महापालिकेचा ४० फूट रस्ता आणि पश्चिमेकडील सिडकोचा २० मीटर रुंद रस्ता या पुलाद्वारे जोडला जाणार असल्याने मार्गाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिली.
---
४८.४० कोटींचा खर्च; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात
या प्रकल्पाचा एकूण खर्च ४८ कोटी ४० लाख २२ हजार रुपये आहे. पुलाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
--
तज्ज्ञांकडून तांत्रिक पडताळणी
सिडको, जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ मागवण्यात येत आहे. पुलाचा संकल्पनात्मक आराखडा आयआयटी मुंबई किंवा व्हीजेआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून तपासला जाईल, अशी माहिती शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.
---
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत असताना पनवेल परिसरातील कनेक्टिव्हिटी सक्षम आणि सुकर करणे ही काळाची गरज आहे. गाढी नदीवरील नवीन पूल हा केवळ वाहतूक कोंडी कमी करणारा प्रकल्प नाही. तर विमानतळाकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित, गतिमान आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा दुवा ठरेल. पनवेल शहराच्या भविष्यातील वाहतूक आराखड्यात या पुलाची भूमिका अत्यंत निर्णायक असेल.
- मंगेश चितळे, आयुक्त व प्रशासक, पनवेल महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Bihar Election Result 2025 Live Updates : वैशाली जिल्ह्यातील कोणत्या जागेवर कोणी विजय मिळवला?, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Latest Live Update News Marathi: नवले पुलाजवळ तीन वर्षांत अपघातांमध्ये २७ जणांचा बळी

SCROLL FOR NEXT