मुंबई

उल्हासनगरात भाजपला मोठा धक्का;

CD

उल्हासनगरात भाजपला धक्का
माजी नगरसेविका मीना सोंडे, किशोर वनवारी शिवसेनेत

उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : भाजपच्या माजी नगरसेविका मीना सोंडे, माजी नगरसेवक किशोर वनवारी आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत यांनी एकाच व्यासपीठावर ‘घरवापसी’ करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केले. मुंबईतील उत्साहाने भरलेल्या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद केवळ वाढलीच नाही, तर आगामी निवडणुकांच्या तोंडावर विकासाच्या राजकारणाला नवा वेग मिळाल्याचे स्पष्ट झाले.
उल्हासनगर परिसरातील राजकीय घडामोडींना वेग देणारी महत्त्वाची घटना गुरुवारी रात्री मुंबईत पाहायला मिळाली. मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्याला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की, शिवसेना हा फक्त राजकीय पक्ष नसून जनसेवेची चळवळ आहे. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी आणि सन्मान मिळेल. उल्हासनगर शहराचा विकास आणखी गतिमान करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
या प्रवेशामुळे उल्हासनगरातील शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असून, पक्षाच्या आगामी राजकीय समीकरणांना नवसंजीवनी मिळाली असल्याचे मत उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी व्यक्त केले. शहरातील ‘विकास यात्रा’ला नवा वेग मिळणार असल्याची खात्री व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Sutar Maharashtra Bhushan: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

Katraj Accident : कात्रज चौकात चिकन वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आग; वाहतुकीस अडथळा!

Pune ATS: जुबेरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स; अल-कायदासाठी काम, न्यायालयीन कोठडीत झाली रवानगी

PM Modi big Statement on Congress : बिहारमधील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? ; मोदींच्या ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघात प्रकरणी कंटेनर मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT