गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’
मुंबई, ता. १४ : मराठी लोककला आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे दरवर्षी ‘मृदगंध पुरस्कार’ प्रदान केला जातो. यंदाच्या १५व्या सोहळ्यात गझलगायक भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिदिनानिमित्त २६ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने कलाक्षेत्रातील विविध मान्यवरांचाही सन्मान करण्यात येणार आहे. लोककला, अभिनय, दिग्दर्शन, शिल्पकला आणि नवोन्मेष प्रतिभा अशा विविध क्षेत्रांतील कलाकारांना यावर्षी पुरस्कार प्रदान केले जातील. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या प्रतिकृतीचे मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्यात उस्ताद शाहीद परवेझ खान यांचे सतारवादन आणि रेशमा मुसळे परितेकर यांचे लावणी सादरीकरण रसिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, भालचंद्र मुणगेकर, सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे, आमदार अमित साटम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून, सूत्रसंचालन डॉ. समीरा गुजर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. २०१२ साली स्थापन झालेल्या विठ्ठल उमप फाउंडेशनने आजवर अनेक गरजू कलाकार, शेतकरी, कॅन्सरग्रस्त रुग्ण तसेच कोविड काळातील कलावंतांना मदत केली आहे. समाज आणि कलेप्रतिची बांधिलकी जपत या संस्थेने सतत उपक्रम राबवले आहेत. २६ नोव्हेंबरचा हा पुरस्कार सोहळा लोककला आणि संगीत क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करणारा तसेच नव्या कलावंतांना प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.