मुंबई

दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली

CD

दिव्यात दुमजली चाळीची गॅलरी कोसळली
अग्निशमन दलाकडून ३० व्यक्तींची सुटका
कळवा, ता. १६ (बातमीदार) : दिव्यातील दिवा महोत्सव मैदानाजवळील एका जुन्या दुमजली चाळीची गॅलरी कोसळल्याची घटना शनिवारी (ता. १५) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या सुमारे ३० व्यक्तींची अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सुखरूप सुटका केली.
दिव्यातील दिवा महोत्सव मैदानाजवळ असलेली सावळाराम स्मृती नावाची दुमजली चाळ आहे. ही चाळ सुमारे २० ते २५ वर्षे जुनी असून, त्यात २१ सदनिका आहेत. साधारण ५० ते ५५ व्यक्ती या चाळीत राहत होत्या. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक पहिल्या मजल्यावरील गॅलरी कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दिवा अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या ३० जणांना शिडीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, महापालिका प्रशासनाने ही चाळ धोकादायक म्हणून घोषित केली आहे. चाळीतील सर्व रहिवासीयांना सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला, तर निघू शकतात दिवाळे; जाणून घ्या काय होऊ शकतात परिणाम

Tips for Long Lasting Perfume : सकाळी लावलेला परफ्युम दिवसभर कसा टिकवून ठेवायचा? वाचा 'या' सोप्या टिप्स

KL Rahul retirement talks: केएल राहुल क्रिकेटमधून निवृत्त होणार? ; जाणून घ्या, त्याने स्वतःच याबद्दल नेमकं काय सांगितलय

अक्षय खन्नाच्या सिनेमात काम करण्यास मराठी अभिनेत्रीने दिलेला नकार ; आता होतोय पश्चाताप

'तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू' शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाचा धमाकेदार डान्स, viral video

SCROLL FOR NEXT