मुंबई

तुंबलेल्या गटारांवर शिवसेना ठाकरे गटाची मात्रा

CD

तुंबलेल्या गटारांची ठाकरे गटाची स्वच्छता मोहीम
ज्योती पाटील यांनी स्वखर्चातून सोडवली समस्या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : दिवा शहरातील अनेक इमारती आणि चाळींमध्ये तुंबलेल्या गटारांची समस्या ठाकरे पक्षाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील यांनी स्वखर्चातून सोडवली आहे. रविवारी (ता. १६) राबवण्यात आलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवा शहरातील अनेक निवासी भागांमध्ये गटारे पूर्णपणे पाण्याने भरलेली असून अंतर्गत नाले तुंबले होते आणि अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी साचले होते. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन ज्योती पाटील यांनी तत्काळ यावर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःच्या खर्चातून परिसरातील गटारे आणि अंतर्गत नाले साफ करण्यासाठी पुढाकार घेतला. रविवारी पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही स्वच्छता मोहीम राबवली. यामुळे साचलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या या कामावर दिवा शहरवासियांनी आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT