मुंबई

बदलापूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीची रॅली

CD

बदलापूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीची रॅली
शक्तिप्रदर्शनानंतर उमेदवारी अर्ज दाखल
बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीच्या उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवारी (ता. १६) बदलापूरमध्ये मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. हजारोंच्या उपस्थितीमुळे बदलापूर शहर अक्षरशः दणाणून गेले.

बदलापूर पश्चिम येथील रमेशवाडी भागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. भाजप आमदार किसन कथोरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री आशीष दामले आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या उपस्थितीत ही रॅली निघाली. पश्चिमेकडील बाजारपेठेतून भव्यदिव्य मार्गक्रमण करत ही रॅली नगरपालिकेत दाखल झाली. तेथे रुचिता घोरपडे यांनी निवडणूक अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. या रॅलीतून भाजप आणि राष्ट्रवादीचे जोरदार शक्तिप्रदर्शन दिसून आले. पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवातीलाच वेगळे ‘तापमान’ मिळाले.

रॅलीदरम्यान आमदार किसन कथोरे म्हणाले की, ‘‘विधानसभेतील चमत्कार नगरपालिकेतही घडेल; रुचिता घोरपडे यांचा विजय निश्चित आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा या रॅलीत सहभाग नसल्यामुळे, ही लढत अधिकच रोमहर्षक आणि अनपेक्षित वळण घेणारी ठरेल, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे रॅलीपासून दूर
भाजप शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे या महत्त्वाच्या रॅलीत गैरहजर राहिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार म्हात्रे यांचे कुटुंबातील सहा सदस्य शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. स्वतः भाजपचे आमदार असूनही त्यांनी युतीची रॅली टाळल्यामुळे त्यांच्या ‘दुहेरी अडचणी’ची चर्चा राजकारणात रंगली आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या शक्तिप्रदर्शनात म्हात्रे यांच्या अनुपस्थितीमुळे शहरातील राजकीय तापमान आणखी वाढले असून, आगामी निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT