मुंबई

"ये पब्लिक है सब जानती है";

CD

महापौरपदावर श्रीकांत शिंदे यांचा फिल्मी स्टाइल अंदाज
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात हजेरी
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव २०२५ कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आणि भव्य पुतळा उभारून कल्याणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केल्याबद्दल आयोजक मंडळातर्फे त्यांचा मानपत्र, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. शिंदे यांनी सामाजिक प्रबोधन, शिक्षणवाढ, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा शहरात अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढील काळातही विकासकामे सुरू राहतील, असे आश्वासन दिले. होऊ घातलेल्या महापालिकेच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय चर्चांनाही या कार्यक्रमात रंग मिळाला. विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना श्रीकांत शिंदे यांनी ‘ये पब्लिक है, सब जानती है’ कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार, असा फिल्मी स्टाइल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
या भीम महोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि प्रख्यात गायिका कडूबाई खरात यांच्या गाण्यांचा कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार राजेश मोरे, अण्णा रोकडे, देवचंद आंबादे, समितीचे अध्यक्ष सुमेध हुमणे, अतिश गायकवाड, राजू रोकडे, शिवसेनेचे महेश गायकवाड, नीलेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT