मुंबई

एकदिशा मार्गिकेमुळे कोंडी नियंत्रणात

CD

विरार, ता. १६ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांबरोबरच वाहतूक कोंडीची समस्याही मोठी आहे. वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकाजवळ प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडताना द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी विरार पूर्वेच्या जुने महापालिका कार्यालय व नालासोपारा येथील मजेठिया असे दोन ठिकाणचे रस्ते एक दिशा मार्ग केले आहेत. या एक दिशा मार्गिका धोरणामुळे या ठिकाणचे रस्ते मोकळे झाले असून, नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे.

विरार वाहतूक शाखेने शहरातील अति गर्दी व वाहतूक कोंडी निर्माण होणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले होते. यात काही रस्त्यांच्या ठिकाणी एक दिशा मार्गिका तयार करणे गरजेचे असल्याने तसा आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात वर्तक चौक ते जुने विरार पोलिस ठाणे महापालिका कार्यालयासमोरून जाणारा रस्ता आणि मजेठिया नाका ते टोटाळे तलाव वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३१ ऑक्टोबरपासून एक दिशा मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी दोन्ही मार्गांवर वाहनांची गर्दी आणि फेरीवाल्यांमुळे कोंडी होत होती, मात्र एक दिशा मार्गिका धोरण लागू केल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नियुक्त करून याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच महापालिकेच्या मदतीने त्या ठिकाणी बसणारे अनधिकृत फेरीवालेही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT