जाहिरात लेख
मोतीलाल ओसवाल सदर
एल अँड टी फायनान्स : लक्ष्य - ३३०
एल अँड टी फायनान्स ही डिजिटल सक्षम, धोक्याबाबत जागरूक असलेली आणि ग्राहककेंद्री अशी छोट्या ग्राहकांना कर्ज देणारी कंपनी म्हणून बदलत आहे. सायक्लोप्स, नोस्ट्राडॅम्स व हेलिको ही तिची एआय साधने कर्ज मंजुरी, कर्ज घेणाऱ्यांची व कर्ज खात्यांची छाननी, या क्षेत्रात चांगले बदल करीत असल्यामुळे यासंदर्भातील कंपनीचे निर्णय अत्यंत वेगवान आणि अचूक, स्मार्ट असे होत आहेत. त्यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन झाल्यामुळे आर्थिक व्यवस्थेच्या कोणत्याही चक्रात उत्तम कामगिरी बजावेल, असे सक्षम मॉडेल कंपनी निर्माण करीत आहे. कृषी कर्ज, दुचाकी कर्ज, गहाण कर्ज, सोने कर्ज आणि छोटे कर्ज अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांत त्यांची खाती असल्यामुळे त्यांच्या कर्जाची गुणवत्ताही चांगली आहे आणि त्यांची वाढही स्थिरपणे पण चांगल्या पद्धतीने होत आहे. फोनपे, क्रेड आणि ॲमेझॉनसारख्या आघाडीच्या डिजिटल कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी केल्याने, त्यांचा ग्राहकवर्ग आणि कामाची व्याप्ती वाढते आहे. कामातील कार्यक्षमता, काटेकोर नियमबद्ध कर्जवाटप आणि तांत्रिक नवकल्पनांचा वापर यामुळे एल अँड टी फायनान्स ही डिजिटल सक्षम आणि उच्च दर्जाची वित्तसंस्था म्हणून आपले स्थान बळकट करून त्याद्वारे चांगले मूल्यवर्धन देण्यास सज्ज झाली आहे.
---
ह्युंदाई मोटर्स : लक्ष्य - २,८०१
देशातील उच्च दर्जाच्या प्रवासी गाड्या तयार करणारी मुख्य कंपनी हे आपले स्थान ह्युंदाई मोटर्स बळकट करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार मोटारींची निर्मिती, निर्यातीत होत असलेली वाढ आणि योग्य वेळी केलेली क्षमतावाढ यामुळे त्यांना देशात या क्षेत्रात चांगले स्थान मिळत आहे. एसयूव्ही आणि आधुनिक आलिशान गाड्यांवर भर देताना ग्राहकांच्या आवडीनिवडींवर लक्ष ठेवून उत्पादन करण्याचे त्यांचे धोरण आहे. आर्थिक वर्ष २०२७मध्ये त्यांच्या अनेक नव्या मोटारी बाजारात येण्याच्या बेतात असून, त्यामुळे त्यांचे मोटारींचे खाते अत्यंत आकर्षक होईल आणि वेगवेगळ्या किमतीच्या गाड्यांच्या क्षेत्रात त्यांची उपस्थिती छाप पाडेल. त्यांच्या निर्यातीत स्थिरपणे होत असलेली वाढ पाहून ह्युंदाईची उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता आणि जागतिक व्यापारात त्यांनी साधलेला समन्वय दिसून येतो. त्यांच्या पुण्यातील नव्या प्रकल्पाच्या खर्चामुळे त्यांच्या अल्पकालीन नफा क्षमतेवर थोडासा परिणाम होणार असला तरी या प्रकल्पामुळे त्यांच्या दीर्घकालीन क्षमतेत आणि उत्पादनात अर्थपूर्ण वाढ होणार आहे. नवकल्पनांचा वापर तसेच आपला ब्रँड सर्वत्र पोहोचावा यासाठी केलेले प्रयत्न आणि खर्चावर ठेवलेले नियंत्रण यामुळे ह्युंदाई मोटर इंडिया ही बाजारातील वाढीव मागणी पूर्ण करण्याची संधी साधणार तसेच त्यायोगे भारतीय वाहन क्षेत्रातील आपले नेतृत्वाचे स्थान बळकट करणार हे निश्चित आहे.
------
जिंदाल स्टेनलेस : लक्ष्य - ८७०
जिंदाल स्टेनलेस ही भारताची भविष्यासाठी सज्ज आधुनिक स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी म्हणून नावारूपाला येत आहे. सक्षम कामकाज, विविध क्षेत्रांत वावर आणि क्षमता वाढीमुळे त्यांना अग्रस्थानाचा हा मान मिळत आहे. वायर रॉड, रेबर आणि कोल्ड रोल्ड स्टील अशा मूल्यवर्धित उत्पादनांमुळे वाहतूक, ग्राहक आणि पायाभूत क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील त्यांची उपस्थिती बळकट होत आहे. स्टेनलेस स्टीलची मागणी वाढत असताना आणि पर्याय म्हणून कार्बन स्टीलचा वापर वाढत असताना जिंदाल स्टीलही या वाढीची संधी साधण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीत कंपनीचा वाटा ४२ टक्के झाला असून, जयपूर येथील हरित हायड्रोजन प्लांट लवकरच सुरू होईल. त्यामुळे त्यांचे पर्यावरणपूरक कामकाज वाढेल आणि खर्चही कमी होईल. महाराष्ट्र आणि इंडोनेशियात त्यांनी धोरणात्मक भांडवली खर्च वाढवला असून, त्यामुळे त्यांची वाढ आणि विस्तार दृष्टिपथात येत आहे, तसेच त्यांच्या ताळेबंदातील शिस्त व समतोलदेखील साधला आहे. खाणकाम, वेगवेगळ्या क्षेत्रांत मूल्यवर्धन आणि डिजिटल क्षेत्राचा वाढता वापर यामुळे त्यांची स्पर्धात्मकता वाढते आहे. क्वालिटी कंट्रोल आणि कार्बन संदर्भातील नियमांवर स्पष्टता आल्याने त्यासंदर्भातील नियम पालन आणि कंपनीने केलेल्या प्रगतीचा फायदा त्यांना मिळालेच. तसेच कार्यक्षमता, लवचिकता आणि मूल्यनिर्मिती यांच्यावर भर देणारी जागतिक क्षेत्रातील स्पर्धात्मक कंपनी असा आपला लौकिक सिद्ध करण्यास कंपनी सज्ज झाली आहे.
------
सफारी इंडस्ट्रीज : लक्ष्य - २,७००
सफारी इंडस्ट्रीज हा देशात वेगाने वाढणारा लगेज ब्रँड म्हणून आपली स्थिती बळकट करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने, वेगवेगळ्या प्रकारच्या विक्री साधनांमधील अस्तित्व आणि एकात्मिक उत्पादन प्रक्रिया यामुळे त्यांना हे स्थान मिळत आहे. ई-कॉमर्स तसेच नव्या पद्धतीच्या व्यापार-विक्री पद्धती तसेच आपल्या दुकानांचा वेगवेगळ्या शहरांत होत असलेला विस्तार आणि देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधील जोमदार व्यवसाय, यामुळे त्यांनी वाढीला अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. कामकाजातील कार्यक्षमता आणि त्यांच्या जयपूर उत्पादन केंद्रात, कच्चामाल आणि त्याचे भाग स्वतःच निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे, खर्च कपात करण्यात व नफा क्षमता वाढवण्यात ते यशस्वी झाले आहेत. कडक स्वरूपाच्या बॅगा आणि उच्च दर्जाच्या उत्पादनांमधील त्यांचा वाढता वाटा यामुळे त्यांनी आपल्या भांडारात उच्च श्रेणीवर दिलेला भर दिसून येतो. कंपनी दर महिन्याला चार-पाच नवीन स्टोअर सुरू करीत असून, क्षमतांचा पुरेपूर वापर करणे वाढवल्याने कामकाजातील कार्यक्षमता सर्वोच्च पातळीवर नेण्यात ते सज्ज झाले आहेत. मऊ प्रकारच्या बॅगांमध्ये मोठी स्पर्धा असूनही शिस्तबद्ध प्रकारचे आणि विक्री, डिजिटल माध्यमांमधील त्यांचा वाढता प्रभाव आणि उच्च दर्जाचा ब्रँड म्हणून स्वतःला प्रस्थापित केल्याने संघटित लगेज क्षेत्रात वाढ, नफाक्षमता दाखवण्यास आणि या क्षेत्रात अग्रगण्य होण्यास ही कंपनी सज्ज झाली आहे.
------
मॅक्स फायनान्शिअल सर्व्हिस : लक्ष्य - २,१००
मॅक्स लाइफ इन्शुरन्स ही देशात सर्वात जास्त सातत्यपूर्ण उत्तम काम करणारी खासगी जीवन विमा कंपनी म्हणून आपले स्थान बळकट करीत आहे. वेगवेगळ्या प्रकारची विमा सेवा आणि सर्व माध्यमातून वाढवलेली विक्री यामुळे त्यांना हे स्थान मिळत आहे. कंपनीच्या विविध सेवांपैकी, बोनस न देणाऱ्या पॉलिसींमध्ये आणि ॲन्यूइटी विभागातही जादा व्यवसाय करून नफा क्षमता टिकवून ठेवण्यावर कंपनीची पकड आहे. त्यांच्या स्वतःच्या आणि भागीदारांसह होत असलेल्या व्यवसायात चांगली वाढ होत असून, धोरणात्मक बदलांमुळे कंपनीचा सातत्यपूर्ण विस्तार होत आहे. तसेच चांगली मूल्यनिर्मितीदेखील होत आहे. पॉलिसी वितरणात ॲक्सिस बँक ही त्यांची मुख्य भागीदार असून, त्यांच्या इतर भागीदारांचे कामही वेगाने वाढत आहे. त्यामुळे त्यांचे काम एककेंद्री राहण्यातील धोके कमी होत आहेत. कामकाजातील शिस्त, सातत्यपूर्ण कामगिरी दाखवण्याकडील कल व खर्चाचे कमी होत असलेले प्रमाण यामुळे त्यांची नफाक्षमता आणि कार्यक्षमता बळकट होत आहे. विमा देताना तंत्रज्ञानाचा जास्त वापर, पर्यावरणपूरक ऊर्जेवर दिलेला भर आणि ग्राहककेंद्री उपक्रम यामुळे त्यांच्या सेवेचा दर्जा आणि व्याप्ती वाढते आहे. हमखास मूल्यवाढ, शिस्तबद्ध भांडवली व्यवस्थापन आणि उच्च दर्जाच्या क्षेत्रावर दिलेला भर, यामुळे मॅक्स लाइफ ही नफा क्षमता स्थिर ठेवण्यात आणि भारताच्या जीवन विमा क्षेत्रात मोठा विस्तार करण्यास सज्ज झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.