मुंबई

Dr. Meenakshi Patil: डॉ.मीनाक्षी पाटील यांच्या‘ललद्यदस् ललबाय’ या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन’

मीनाक्षी पाटील यांच्या कवितांमधील दृश्यात्मकतेचा नाट्याविष्कार

CD

कवयित्री , चित्रकार डॉ.मीनाक्षी पाटील यांच्या ‘ललद्यदस् ललबाय’ या काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन ' हा कार्यक्रम मंगळवार, मंगळवारी, 18 नोव्हेंबर, रोजी सायंकाळी 5 वाजता मिनी थिएटर, तिसरा मजला, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

‘ललद्यदस् ललबाय’ मधील कविता या केवळ वैयक्तिक भावजीवनाचा आविष्कार करीत नाहीत, तर या कवितेतून व्यष्टी आणि समष्टीचा फार मोठा व्यापक पट उलगडतो.जगण्याच्या धबडग्यात सामोऱ्या येणाऱ्या विविध मनोवृत्तींचा, त्यातील गुंतागुंतीचा किेंवा एकूणच मानवी अस्तित्वाचा ही कविता तात्त्विक दृष्टीकोनातून विचार करते. मीनाक्षी पाटील या चित्रकार असल्याने त्यांच्या कवितेत येणारी दृश्यात्मकता एक आगळंच नाट्य निर्माण करते . असा हा चिंतनात्मक प्रगल्भ नाट्याविष्कार म्हणजे हा सदर कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम.

सदर कार्यक्रम ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित सादर करणार असून आजपर्यन्त मुंबई , पुणे , सावंतवाडी, रत्नागिरी आदि ठिकाणी या काव्य अभिवाचनाचे प्रयोग झालेले आहेत . वरील कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून सर्वांनी सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कवयित्री डॉ.मीनाक्षी पाटील व ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Prices Fall : सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना मोठा दिलासा; देशभरात साखरेच्या किरकोळ दरात मोठी घट

Class One Sports Officer: माळशिरसचा रुद्रांक्ष ठरला पहिला! क्रीडा अधिकारीपदी ‘क्लास वन’ निवड होण्याचा मान; नेमबाजीत ऐतिहासिक कामगिरी

Kalyan Latur Expressway : माळशेज घाटात होणार 8 किलोमीटर लांबीचा बोगदा; 35 हजार कोटींच्या 'जनकल्याण एक्सप्रेसवे'ला सरकारची मान्यता, नव्या महामार्गाची काय वैशिष्ट्ये?

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

Gold Rate Today: गणेश चतुर्थीला सोनं स्वस्त! तब्बल 10 हजारांनी घसरण, आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT