मुंबई

धारावीत अपघातात महिलेचा मृत्‍यू

CD

धारावीत अपघातात महिलेचा मृत्‍यू
अल्‍पवयीन चालकाविरोधात गुन्हा दाखल
धारावी, ता. १७ (बातमीदार) : कारच्या धडकेत धारावीतील शास्त्री नगर येथे राहणाऱ्या सुरेखा कदम (५४) यांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना सोमवारी दुपारी घडली, तर मृत महिलेचे पती सत्यवान मारुती कदम (६०) हे जखमी झाले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या अल्‍पवयीन कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्‍यवान आणि सुरेखा कदम हे पती-पत्‍नी नियमित तपासणीसाठी सायन कोळीवाडा येथील सीजीएस रुग्णालयात गेले होते. काम आटोपून घरी परतताना दुपारी १.४५ च्या सुमारास संत रोहिदास मार्गावरील मुकुंद नगर येथील संतोष वाइनसमोर भरधाव कारने दोघांना धडक दिली. सत्यवान व त्यांची पत्नी सुरेखा रस्त्यावर पडले. सत्यवान यांच्या डोक्याला, पायाला व हाताला तसेच इतर ठिकाणी मार लागला. त्यांची पत्नी बेशुद्ध पडली होती. सायन रुग्णालयात डॉक्टरांनी सुरेखा कदम यांना मृत घोषित केले. कारचा चालक, मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघात करणाऱ्या अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघात झालेली गाडी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू बिकडकर यांनी दिली. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त कक्कया समाज महासंघ मुंबईचे प्रदेश अध्यक्ष राम कोकणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT