मुंबई

बनावट लोकल तिकीटासह प्रवासी ताब्यात

CD

बनावट लोकल तिकिटासह प्रवासी ताब्यात
तिकीट तपासणीस सुजाता काळगांवकर यांची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मध्य रेल्वेच्या महिला तिकीट तपासणीस सुजाता काळगांवकर यांच्या दक्षतेमुळे बनावट सिझन तिकिटाचे रॅकेट उघडकीस आले आहे. मस्जिद स्थानकात तपासणीदरम्यान त्यांनी एका प्रवाशाचे तिकीट संशयास्पद असल्याचे ओळखत त्वरित कारवाई केली.
सीएसएमटी ते कल्याण स्पेशल स्क्वॉडमध्ये कार्यरत असलेल्या काळगांवकर या शनिवारी (ता. १५) मस्जिद स्थानकात नियमित तपासणी करत होत्या. त्या वेळी एका प्रवाशाने दुसऱ्या श्रेणीचे तिमाही सिझन तिकीट (क्रमांक UFV-२९११४८४१५) तपासणीसाठी दाखवले. हे तिकीट २० ऑगस्ट २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी सीएसएमटी ते दादर या मार्गावर वैध असल्याचे नमूद होते. तपासणीदरम्यान तिकिटावरील माहिती आणि प्रवाशाने सांगितलेली माहिती एकमेकांशी जुळत नसल्याचे कालगांवकर यांच्या लक्षात आले. प्रवाशाने हे तिकीट मस्जिद स्थानकातून घेतल्याचा दावा केला होता, परंतु तिकिटावर जारी स्थानक भायखळा असे नमूद होते. याशिवाय प्रवाशाने आपले नाव शमीन शेख असल्याचे सांगितले, तर तिकिटावर मोहम्मद दिलशाद असे नाव होते. या विसंगतीमुळे तिकीट बनावट असल्याची खात्री पटताच त्यांनी वरिष्ठांना कळवून प्रवाशाला ताब्यात घेतले. याप्रकरणी तत्काळ एफआयआर दाखल करण्यात आला असून, आरोपीला पुढील चौकशीसाठी जीआरपीकडे सोपविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT