मुंबई

आळंबी व्यवसायातून महिला स्वावलंबी

CD

अळिंबी व्यवसायातून महिला स्वावलंबी
वर्षाला १५ ते २० लाखांची उलाढाल
वाणगाव, ता. १९ (बातमीदार) : अळिंबी उत्पादन ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत बनू लागला आहे. डहाणू कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनामुळे महिला सबळ बनू लागल्या आहेत. आतापर्यंत २० महिला बचत गटाच्या माध्यमातून अळिंबी उत्पादनातून वर्षाला १५ ते २० लाखांची उलाढाल केली जात आहे. अळिंबी व्यवसाय करणारे बचत गट आज पालघर जिल्ह्यातील इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. स्वावलंबनाचा नवा मार्ग शोधण्यासाठी अळिंबी उत्पादन हे प्रभावी साधन बनू लागले आहे.

डहाणू तालुक्यात गेल्या पाच वर्षांत हजारो शेतकरी, युवक आणि बचत गटातील महिलांनी अळिंबी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले आहे. घरच्या घरी कमी जागा, कमी खर्च आणि कमी श्रम असल्याने अळिंबी व्यवसाय करण्याचा ओढा वाढला आहे. या उत्पादणासाठी महिलावर्ग उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. “महिला फक्त “चूल आणि मूल” सांभाळण्या पुरत्या मर्यादित नसून उद्योग-व्यवसायातही सक्षम आहेत” हे अळिंबी व्यवसायातून महिलांनी दाखवून दिले आहे, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी सांगितले आहे.

कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञा रूपाली देशमुख यांनी अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी मार्केटिंग तसेच केंद्राचे संगणकतज्ज्ञ अनिल कुमार सिंग यांनी अन्न सुरक्षा परवाना काढून महिला बचत गटाला सहकार्य केले. त्यातून अळिंबी उत्पादन हा कमी खर्चात, कमी जागेत आणि अल्प कालावधीत होणारा व्यवसाय असल्याचे त्यांना कळले.

अळिंबी बीजनिर्मिती केंद्राची उभारणी
जिल्ह्यातील अळिंबी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कृषी विज्ञान केंद्राने २०२२ मध्ये केंद्रात अळिंबी बीजनिर्मिती केंद्र उभारून प्रतिकिलो १०० रुपये या दराने जिल्ह्यातील बचत गटातील महिला, अळिंबी उत्पादक शेतकरी, युवक यांच्यासाठी अल्प दरात अळिंबी बीजविक्री करण्यात येत आहे.

महिला बचत गटांची निर्मिती
जिल्ह्यात मागील पाच वर्षांत अळिंबी उत्पादन घेणाऱ्या २० हून अधिक महिला बचत गटांची निर्मिती होऊन सध्या ऑईस्टर या जातीचे अळिंबी उत्पादन घेत आहेत.
डहाणू तालुक्यातील बांधघर येथील भूमी बचत गट, शिसणे येथील धनश्री बचत गट, राधिका महिला बचत गट, चिंचले येथील पिंका महिला बचत गट, रोशनी स्वयंसहाय्यता महिला गट, वाडा तालुक्यातील संजीवनी महिला बचत गट, विक्रमगड सातखोर येथील वंदिता महिला बचत गट, या प्रमुख महिला बचत गटांसह जव्हार, मोखाडा तालुक्यातील गटांचाही समावेश आहे.

अळिंबी व्यवसायातून वर्षाची उलाढाल : सुमारे १५ ते १६ लाख
जिल्ह्यातील गटांचे अळिंबी उत्पादन : सुमारे ६ टन
कृषी केंद्रात प्रशिक्षण आणि कार्यशाळा : ५० हून अधिक
सहभागी महिला : एक हजारांहून अधिक
प्रति बचत गट उत्पन्न : ७० ते ८० हजार महिना
विक्रीचा दर : सुमारे ३०० रुपये प्रतिकिलो


अळिंबी व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांनी आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मेहनत, जिद्द या गुणांच्या जोरावर गावातील महिलाही उद्योजकतेच्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात. हे अखेर बचत गटातील महिलांनी सिद्ध करून दाखविले आहे.
- रूपाली देशमुख गृह विज्ञान शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, डहाणू

कृषी विज्ञान केंद्रात मिळालेल्या प्रशिक्षणामुळे अळिंबी व्यवसायाला गती मिळाली आहे. अळिंबी व्यवसाय हा स्वावलंबनासाठी फायदेशीर ठरत आहे. व्यापक व्यवसाय केल्यास जिल्ह्यात शाश्वत महिला सबलीकरण होईल.
- सरीता भरभरे, अध्यक्ष, रोशनी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, चिंचले, डहाणू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT