मुंबई

टीईटी परीक्षा केंद्रांवर हायटेक नजर

CD

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १९ : यंदा नव्याने शिक्षक भरतीसाठी असणाऱ्या उमेदवारांसह शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारही टीईटी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाढलेल्या उमेदवारांमुळे केंद्रांची संख्याही वाढवली आहे. या परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये. एक फोटो दोन नावे, डमी विद्यार्थी येऊ नयेत; तसेच २०२० ते २०२२मध्ये झालेल्या टीईटीतील गैरप्रकाराची पुन्हा पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रथमच तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे. बोगस उमेदवारांना ओळखण्यासाठी ‘कनेक्ट व्हू’, ‘फोटो व्हू’ आणि ‘हॉटलाइन’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. यंदा नव्याने शिक्षक भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांबरोबरच कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा अनिवार्य केली आहे. यात फक्त सेवानिवृत्तीला आलेल्या दोन ते तीन वर्षे बाकी असणाऱ्या शिक्षकांना सूट देण्यात आली आहे. ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षकांना पदोन्नतीही मिळणार नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे यंदा दुप्पट संख्येने शिक्षक पात्रतेसाठी उमेदवार परीक्षेला बसले आहेत. याची सर्व तयारी पूर्ण झाली असून ठाणे जिल्ह्यातील केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
ठाणे जिल्ह्यातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, १७ हजार ३३ उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. पेपर एकसाठी सात हजार ८०३ आणि पेपर दोनसाठी ९ हजार २३० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे. उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे, शैक्षणिक ज्ञानाचे; तसेच बालविकास व शैक्षणिक मानसशास्त्राचे मूल्यांकन करण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय शिक्षण हक्क आरटीई कायदा, २००९ अंतर्गत बंधनकारक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देणे या परीक्षेचा प्रमुख हेतू आहे.

नियमांचे पालन करा!
सर्व उमेदवारांनी वेळेवर प्रवेशपत्र डाउनलोड करावे. परीक्षेवेळी केंद्रावर वेळेत उपस्थित राहून नियमांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक सुरक्षा, आसनव्यवस्था आणि पर्यवेक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही शिक्षकांच्या गुणवत्तेचे प्रतीक असून या माध्यमातून गुणवत्ताधारक शिक्षक प्राप्त होण्यास मदत होणार आहे, असे मत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केले.

अशी आहे प्रणाली
फोटो व्हू : उमेदवाराची ओळख तंतोतंत जुळवण्यासाठी चेहऱ्यांची तुलना करणारी एआय प्रणाली.
कनेक्ट व्हू : सर्व परीक्षा केंद्रे एका कंट्रोल रूमशी जोडून लाइव्ह मॉनिटरिंग केले जातात. कोणतीही संशयास्पद हालचाल त्वरित निदर्शनास येते. यासाठी ती वापरली जाईल.

टीईटी परीक्षा या दोन सत्रांत
पहिले सत्र : सकाळी १०.३० ते १
दुसरे सत्र : दुपारी २.३० ते ५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT