मुंबई

पाण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ

CD

पाण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ
खारघर सेक्टर २७ ते ४० मधील वेळापत्रकात बदल
खारघर, ता.१९ (बातमीदार): खारघर सेक्टर २७ ते ४० परिसरात सिडकोकडून रात्री १० ते सकाळी सहा वाजता पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ आल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर सेक्टर २७ ते ४० परिसरात रहिवाशांना पाणी समस्याना तोंड द्यावे लागत आहे. रहिवासी, राजकीय पक्षांनी मोर्चे आंदोलन करून समस्या ‘जैसे थे’ आहे. या भागात सिडकोकडून पूर्वी सकाळी आठ ते रात्री साडे बारा दरम्यान पाणी पुरवठा केला जात होता. पण सिडकोने मंगळवारी (ता.१८) पासून सेक्टर २७, ३०, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४० परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करताना रात्री १० ते सकाळी ६ अशी वेळ केली आहे. पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रयोगात्मक बदल केल्याचे सिडकोकडून आवाहन करण्यात आले आहे. पण पाणी पुरवठ्याची वेळ बदलल्यामुळे सोसायटीच्या सुरक्षा राक्षकांना आता रात्र जागून काढावी लागणार आहे.
------------------------------
प्रायोगिक तत्त्वावर
पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बद्दल केला आहे. या वेळेत रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध झाले तर नागरिकांच्या समंतीने विचार केला जाईल, असे सिडको पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी.व्ही.गायकवाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT