मुंबई

प्रभाग ‘एक’ इच्छुक ‘अनेक’

CD

प्रभाग ‘एक’ इच्छुक ‘अनेक’
आरक्षण सोडतीनंतर उमेदवारांमध्ये शर्यत
पनवेल, ता. १९ (बातमीदार)ः महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही प्रभागात अपेक्षित आरक्षण मिळाल्याने अनेकांना दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी ठरावीक जागा सर्वसाधारण किंवा विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव झाल्याने एकाच जागांवरून इच्छुकांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.
प्रभाग क्रमांक १५- खांदा कॉलनीचा समावेश असलेल्या अनुसूचित जातींसाठी एक जागा राखीव असून, एकनाथ गायकवाड यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे. एक ओबीसी आणि एक सर्वसाधारण महिला राखीव जागा आहे. माजी उपमहापौर सीता पाटील चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे, पण सर्वसाधारण आरक्षण पडल्याने इच्छुकांचा घोळका आहे. या प्रभागामध्ये मोतीराम कोळी, दशरथ म्हात्रे, सनी भोपी, भीमराव पोवार आणि शिंदे शिवसेनेचे शहर प्रमुख शिवाजी थोरवे शर्यतीत आहेत.
प्रभाग क्रमांक १७- भाजपची परिस्थिती तितकीच गुंतागुंतीची आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ दोघेही आता भाजपमध्ये असून, २०१७ मध्ये एकमेकांविरुद्ध लढले होते. या प्रभागात एकच सर्वसाधारण जागा असल्याने दोघांपैकी कोणाला संधी मिळते. प्रभाग क्रमांक ७- एक सर्वसाधारण व एक मागास प्रवर्गाची जागा आहे. या निवडणुकीत लढलेले राजेंद्र शर्मा यांनी पुन्हा दावा केला असून, अमर ठाकूर आणि भाजपचे जिल्हा चिटणीस रवीनाथ पाटील इच्छुक आहेत, पण एक जागा आरपीआयला जाण्याची शक्यता आहे.
प्रभाग १८- दोन ओबीसी, एक सर्वसाधारण महिला, एक खुली जागा आहे. आमदार विक्रांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवणार नसले तरी त्यांच्या पत्नी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहकर, प्रीती जॉर्ज यांनी दावा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT