मुंबई

परतीच्या पावसाने खरीप पिके गेली: शेतकऱ्यांना रब्बी भाजीपाला पिकांचा आधार

CD

शेतकऱ्यांना रब्बीचा आधार
परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून भातशेतीवर अवलंबून न राहता रब्बी हंगामात कडधान्ये आणि भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत; मात्र यंदा परतीचा पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामातील भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
या संकटातून सावरत, शेतकरी आता पुन्हा रब्बी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. पाण्याची योग्य सोय असलेल्या ठिकाणी शेतकरी हिवाळी हंगामात पालेभाज्या घेण्यासाठी शेतीच्या कामात व्यस्त आहेत.
परतीच्या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामही अडचणीत आला असून, रब्बी लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. विहीर, नदी, नाले यांच्यातील पाण्याच्या स्त्रोतांच्या आधारे शेतकरी कारली, दुधी, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, पालक अशा विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड करत आहेत. या ताज्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी मिळत आहे.
पालेभाज्यांसाठी साखळी पद्धतीने नळाद्वारे, पाटाद्वारे किंवा विद्युत मोटारीने पिकांना पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे शेतीत काम करणाऱ्या मजुरांनाही चांगला रोजगार मिळत आहे. शहरांमधून येणाऱ्या शिळ्या भाज्यांपेक्षा या गावरान ताज्या भाज्यांना चांगली मागणी असल्याने, शेतकरी आधुनिकतेचा स्वीकार करत खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
----------------
यावर्षी पाऊस लांबल्याने भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात ओल व पाणी असल्याने उशिराने भाजीपाला लागवडीस सुरुवात केली आहे. सध्या थंडीचा मोसम असल्याने याच काळात भाजीपाला लागवड केली जाते. फेब्रुवारीमध्ये भाजीपाला तयार होऊन विक्री योग्य होत असतो. भाजीपाला पिकाला योग्य वेळी पाणी देणे गरजचे असते.
- विजय सांबरे, शेतकरी, ओंदे गाव
----------------
भाजीपाल्याच्या पीकविक्रीसाठी जे बाहेरील दलाल येत असतात, ते शेतकऱ्यांना खूप कमी भाव देतात व त्यावर शेतकऱ्यांना चांगला नफा होण्याऐवजी त्या दलालांनाच होत असतो. याचे मुख्य कारण म्हणजे विक्रमगड तालुक्यात योग्य बाजारपेठचा अभाव व त्यामुळे हमीभाव नाही.
- सोपान दिघे, शेतकरी, मुहु गाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT