गायमुख घाटाच्या दुरुस्तीचा खेळखंडोबा
कच्च्या काँक्रीटमुळे वाहतूक कोंडी वाढली
ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) : घोडबंदर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गायमुख घाटाच्या दुरुस्तीच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन पुन्हा एकदा फसल्याचे दिसून आले आहे. बुधवारी (ता. १९) सिमेंट काँक्रीट टाकून खड्डे भरण्यात आले. दरम्यान, हे काँक्रीट घट्ट होण्यापूर्वीच वाहतुकीसाठी रस्ता खुला केल्याने मोठी समस्या निर्माण झाली.
खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला, मात्र काँक्रीट घट्ट होण्यासाठी पुरेसा वेळ न देता विभागाने घाईघाईत वाहतुकीला परवानगी दिली. कच्च्या काँक्रीटवरून वाहने जाताच त्यांची चाके जागेवरच फिरू लागली आणि ती खड्ड्यांमध्ये फसली. काही मिनिटांतच हे सिमेंट काँक्रीट रस्त्यावर सर्वत्र पसरले. घाटावर चढणाऱ्या गाड्या जागेवरच घसरू लागल्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी आणखी वाढली. याचा फटका ठाण्यासह पालघर आणि गुजरातकडे जाणाऱ्या वाहतुकीला बसला आणि रात्री उशिरापर्यंत घाट वाहतूक कोंडीत अडकला होता.
नियोजनशून्य कारभार
रस्ता दुरुस्तीसाठी भरलेलल्या काँक्रीटमुळे घाटावर चढणारी वाहने जागेवरच फिरू लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.
१२ सप्टेंबरच्या घटनेची पुनरावृत्ती
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली ही चूक नवी नाही. गेल्या महिन्यात १२ सप्टेंबरलाही याच घाटावर असाच प्रकार घडला होता. त्या वेळी विभागाने खड्ड्यांमध्ये फक्त मातीमिश्रित खडी भरली होती. ती लगेच मजबूत न केल्यामुळे जड वाहनांची चाके जागेवरच फिरू लागली होती आणि मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घाटाच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या या निकृष्ट आणि नियोजनशून्य कामांमुळे घाटावर पुन्हा पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते आणि वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.