मुंबई

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकले दूत

CD

पर्यावरण रक्षणासाठी चिमुकले दूत
पनवेल महापालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २० ः पालिकेच्या ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’अंतर्गत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे, यासाठी ‘पर्यावरण दूत’ निवडण्यात आले आहेत.
कोपरा, मुर्बी, खारघर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये नुकताच विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या अभियानांतर्गत शनिवारी (ता. १५) कोपरा, मुर्बी, खारघर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदल साक्षरता, स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. याबरोबरच प्रत्येक शाळेतून जबाबदार विद्यार्थ्यांची पर्यावरणदूत म्हणून निवड करण्यात आली. पनवेल महापालिकेसोबत विविध पर्यावरणीय उपक्रम, स्वच्छता मोहिमेत मुले सक्रिय सहभाग घेणार आहेत.
---------------------------------
तरुण पिढी घडवणार
पर्यावरण विभागाच्या वतीने उपायुक्त स्वरूप खारगे यांनी महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, या माध्यमातून तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT