मुंबई

सीवूडकरांना वाहनपार्किंगचा भुर्दंड

CD

सीवूडकरांना वाहनपार्किंगचा भुर्दंड
कंत्राटदाराकडून दर पत्रकातील बदलाने नाराजी
जुईनगर, ता.१९ (बातमीदार): नेरुळ सेक्टर ३५, ४० व ४२ परिसरात अनंत गुरुजी चौक, तांडेल मैदान रस्त्यालगत पार्किंगसाठी शुल्कदरांमध्ये कंत्राटदाराने वाढ केली आहे. पण हा प्रकार नियमबाह्य असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महापालिका मालमत्ता विभागातर्फे पार्किंग शुल्क आकारण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराकडून पालिकेने नेमून दिलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारले जात आहे. महापालिकेने सायकल, दुचाकी, तीनचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी दर रुपये २, १० आणि २० आकारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी दोन्ही वाहनांसाठी २० रुपये आकारण्यात येते आहेत. त्यामुळे पालिकेने दुचाकीसाठी १० रुपये ठरवून दिले असताना कंत्राटदार २० रुपये आकारत आहे. शिवाय आकारण्यात येणार दर ४ तास, १० तास कालावधीसाठी असल्याने पाच ते दहा मिनिटांसाठी जरी वाहन पार्क केले तरी २० रुपये द्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
----------------------
आंदोलनाचा इशारा
पालिकेने ठरवून दिलेले दर आणि आकारण्यात येत असलेले दर यामध्ये तफावत आहे. याबाबत मालमत्ता उप आयुक्तांना निवेदन दिले आहे. तरी देखील ही वसुली थांबली नाही, त्यामुळे जन आंदोलन करणार असल्याचे ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख समीर बागवान यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT