मुंबई

बाल लैंगिक शोषणाविरोधात चळवळ

CD

बाल लैंगिक शोषणाविरोधात चळवळ
एनएमएमटीच्या बसद्वारे पोक्सो कायद्याची जनजागृती
नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : बाल लैंगिक शोषणाविरुद्ध समाजात भीती, जागरूकता, कायद्याचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अर्पण संस्थेबरोबर नवी मुंबई महापालिकेने एनएमएमटीच्या १०० बसमधून ‘पोक्सो पकड लेगा’ या उपक्रमाबाबत जनजागृती सुरू केली आहे.
समाजामध्ये बाल लैंगिक शोषणाच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रयत्न सुरू आहेत, मात्र परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे अर्पण संस्थेने बाल लैंगिक शोषणाविरोधात भीती तसेच कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘पोक्सो पकड लेगा’ या आगळ्यावेगळ्या अभियानाला सुरुवात केली आहे. या उपक्रमात नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) १०० बसमधून जनजागृती केल जात आहे. तसेच बाल लैंगिक शोषण सामाजिक समस्या नसून गंभीर कायदेशीर गुन्हा आहे, असल्याचा संदेश दिला जात आहे.
------------------------------------
एनएमएमटी प्रभावी माध्यम
नवी मुंबईतील विविध मार्गांवर एनएमएमटीच्या बसगाड्या धावत असल्यामुळे, दररोज हजारो लोकांच्या नजरेस हा संदेश पडणार आहे. नवी मुंबईत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पोक्सो पकडेल. अत्यंत थेट आणि निर्भीड पद्धतीने दिलेला हा संदेश दिला असल्याने बाल सुरक्षेबाबत सजग करण्याचे प्रभावी माध्यम ठरत अशी संकल्पना आहे.
---------------------------------
सिनेकलाकारांचा पाठिंबा
अभिनेत्री विद्या बालन यांच्यासह श्वेता कवात्रा, मानव गोहील आणि अनुप सोनी अशा सिनेकलाकारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने उपक्रमाचा प्रभाव अधिक वाढला आहे. तसेच पोक्सो पकडेल हा फक्त इशारा नाही, तो बाल सुरक्षेचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्ती जागरूक झाली, तरच असे प्रकार थांबतील, असे अर्पण संस्थेच्या संस्थापिका पूजा तापडिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT