मुंबई

रिक्षाचालकाला लुबाडले

CD

रिक्षाचालकाला लुबाडले
ठाणे ः दारू पिऊन पायी घरी चाललेले रिक्षाचालक संतोष वानखेडे (४२) यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घरी सोडतो, असे सांगितले. संतोष त्यांच्या गाडीवर बसताच दुचाकीवरील एका मुलाने त्यांचा मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता त्यांनी दुचाकी बाजूला लावून संतोष यांना मारहाण करत, मोबाईल आणि एक हजार ८०० रुपये घेऊन पोबारा केला. हा प्रकार सोमवारी (ता. १७) घडला. याप्रकरणी त्या दोघांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
..............

अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे ः भिवंडी येथे आत्याकडे जाते असे सांगून गेलेली १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. ती मंगळवारी (ता. १८) सकाळी घरातून गेल्यानंतर परत न आल्याने तिच्या पालकांनी शोध घेतला, पण ती मिळून आली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
.....


.......
सुरक्षा रक्षकाचा मोबाईल चोरीला
ठाणे : चार्जिंगला लावलेला साडेपाच हजारांचा मोबाईल फोन चोरीला आहे. ही घटना वागळे इस्टेट येथे घडली. याप्रकरणी सुरक्षा रक्षक गुलाबचंद जयस्वाल (६३) यांच्या तक्रारीनुसार वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे बळीराजा अडचणीत; नाशिकचा शेतीमाल विमानतळावरच अडकला

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Israel-Iran Tension : युद्धजन्य परिस्थितीचा सातारा सांगली रत्नागिरीच्या 26 जणांना फटका; तीन दिवसापासून विमानसेवा बंद असल्यामुळे अडकले, : नातेवाईक चिंतेत

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT