मुंबई

पोलिस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या पती-पत्नीवर गुन्‍हा दाखल

CD

पोलिस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या पती-पत्नीवर गुन्‍हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : कोपरी पोलिस ठाण्यातील अंमलदार कक्षात गोंधळ घालत आरडाओरडा करणाऱ्या एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या कामकाजात अडथळा आणणे, धक्काबुक्की करणे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचा संशय आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
कोपरी, गांधीनगर येथील मेहबुबी खान (वय ६१) या १८ नोव्हेंबर रोजी आपली तक्रार देण्यासाठी कोपरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्याचवेळी शेलार कुटुंब हे तक्रारदार महिलेच्या पाठोपाठ दुचाकीवरून पोलिस ठाण्यात आले. अंमलदार कक्षात प्रवेश करताच संबंधित कुटुंबीयांनी जोरजोरात बोलण्यास सुरुवात केली. शेलार यांनी शिवीगाळ केलेली नाही, माझ्याविरोधात तक्रार घेऊ नका, असे म्हणत त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरूच ठेवला. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना संबंधित व्‍यक्‍तीकडून दारूचा वास येत असल्याचे जाणवले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत संबंधित व्यक्तीस संयम बाळगण्याची सूचना दिली. मात्र आरडाओरडा सुरू राहिल्याने शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना ब्रेथ अनालायझर मशीन घेऊन पाचारण करण्यात आले.
त्यावेळी संबंधित व्‍यक्‍तीने मशीनमध्ये श्वास देण्यास नकार दिला. तसेच त्याची पत्नी आणि मुलीने पोलिसांना ब्रेथ अनालायझर तपासणी करण्यास विरोध केला. यावेळी मायलेकींनी पोलिस कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पुढे संबंधित व्‍यक्‍तीची वैद्यकीय तपासणी (मेडिकल) करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यालाही पत्नी व मुलीने जोरदार विरोध केला आणि पुन्हा आरडाओरडा सुरू ठेवला. अखेर वैद्यकीय तपासणीत संबंधित व्‍यक्‍तीने दारूचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण घटनेनंतर मायलेकींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्‍यक्‍ती विरोधात मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलिस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Latest Marathi News Live Update : शेतकरी कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी सोनीपतमध्ये दाखल

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

SCROLL FOR NEXT