मुंबई

वसई-विरारमधील प्रारूप मतदारयादी जाहीर

CD

वसई, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीकरिता विविध पक्ष, इच्छुक मतदार यादीची प्रतीक्षा करत आहेत. महापालिका प्रशासनाने प्रारूप मतदार यादी गुरुवारी (ता. २०) प्रसिद्ध केली असल्याने प्रत्येक इच्छुकाचे मतदारांकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता येत्या काळात मतदारांच्या भेटीगाठी वाढणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिका मुख्य कार्यालय व नऊ प्रभाग कार्यालयांत नागरिकांच्या माहितीसाठी ही यादी जाहीर केली आहे. नागरिकांना हरकती व सूचना मांडायच्या असतील, तर नमुना अ व नमुना-बमध्ये घेण्यात येतील. त्याची मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे, अशी माहिती उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी दिली.

महापालिका मुख्य कार्यालय व सर्व प्रभाग समिती कार्यालय, तसेच पालिकेच्या www.vvcmc.in या संकेतस्थळावर नमुना-अ व नमुना-ब अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. सुट्टीचे दिवस वगळून हरकत व सूचना कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात देता येतील, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

नजरा मतदारांकडे
महापालिकेने एकूण २९ प्रभागरचना तयार केली आहे. त्यापैकी २९ क्रमांकाच्या प्रभागात तीन, तर उर्वरित प्रभागांत चार सदस्य संख्या असणार आहे. मतदारयादी प्रसिद्ध केल्यावर आता आपल्या प्रभागात किती मतदार आहेत, याची जुळवाजुळव केली जाणार आहे. आता पक्ष व इच्छुक प्रचाराच्या कामाला लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : लासलगावात टर्फ मैदानावर राडा! भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला

धनंजय मुंडेंना आणखी एका प्रकरणात क्लिन चीट, राज्याच्या लोकायुक्तांनी फेटाळले आरोप

Latest Marathi News Live Update : ISISशी संबंधित प्रकरणी ATSचे मुंबईत छापे

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

SCROLL FOR NEXT