मुंबई

कोपखैरणे सेक्टर १५ येथील वाहतुक कोंडी सुटणार

CD

वाहतूक कोंडीवर स्कायवॉकचा उतारा
कोपरखैरणे सेक्टर १५ येथील रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना मिळणार दिलासा
वाशी, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे वाशी मार्गावर, गुलाबचंद डेअरी परिसरात नवा पादचारी स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणे सेक्टर १५ येथील डी मार्ट चौक ते तीन टाकीपर्यंत असलेल्या मार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
या पुलासाठी सहा कोटी ५९ लाख तीन हजार १९२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या स्कायवॉकमध्ये सरकता जिना आणि उद्वाहनाची सोय असणार आहे. मागील १० वर्षांपासून या स्कायवॉकची मागणी होती. कोपरखैरणे सेक्टर १५ चा नाका, गुलाब सन्स डेअरी, हा वाशी कोपरखैरणे मार्गावरील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालये, बसथांबे आणि बाजारपेठा असल्याने सतत पादचाऱ्यांची गर्दी असते, ज्यामुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या वेळी मोठी कोंडी होते.
सेक्टर ९, १० च्या मध्यावर बाजारपेठेजवळ स्कॉयवॉक निर्मितीनंतर येतील वाहतूक कोंडीपासून काहीसा दिलासा मिळाला; मात्र त्यापेक्षा कित्येक पटीने कोपरखैरणे सेक्टर १५च्या नाक्यावर वाहतूक कोंडी होत होती. या ठिकाणी दाट लोकवस्ती असूनही रस्त्यांच्या दोन्ही बाजूने सेक्टर ५ ते ८ आणि दुसऱ्या बाजूला १५ ते १८ हा भाग आहे. पूर्वी या दोन्ही रस्त्यांमधून वाहनांना ये-जा करण्यासाठी दुभाजकात जागा होती; मात्र वाहतूक पोलिसांनी पालिकेला विनंती अर्ज केल्यावर ही जागा गाड्यांसाठी बंद करण्यात आली. आता अनेक वर्षांनंतर हा प्रस्ताव मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
--------------------------
लवकरच निविदा
नवी मुंबई महानगरपालिका गुलाबसन्स डेअरीच्या येथे स्कायवॉक उभारणार असून, त्यासाठी सहा कोटी ५९ लाख तीन हजार १९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यांची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. या स्कायवॉकमध्ये सरकता जिना असल्याने आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांना, गर्भवती महिलांना यांचा वापर करणे सोयीस्कर ठरणार आहे, असे नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन २०१७ मध्ये कार्यान्वित झाली

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT