मुंबई

घाटकोपरमध्ये भव्य रामकथा

CD

घाटकोपरमध्ये भव्य रामकथा
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः गुजरातमधील राजकोट येथील सद्‌भावना वृद्धाश्रम या सामाजिक संस्थेच्या १५१ कोटी वृक्षलागवडीच्या महाभियानाला आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने घाटकोपरमध्ये भव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रामकथा २२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान घाटकोपर (पूर्व) येथील आचार्य अत्रे मैदानावर होणार आहे.
पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रामकथेतून मिळणाऱ्या देणग्या आणि अनुदानाच्या मदतीने राजकोट-जामनगर रोडवरील रामपर परिसरात १५ एकर जागेवर नवीन आणि अत्याधुनिक वृद्धाश्रम उभारण्यात येत आहे. या परिसरात ७ नव्या ११ मजली इमारती, मंदिर, अन्नपूर्णा गृह, ग्रंथालय, व्यायामशाळा, योग कक्ष, दवाखाना, बाग, सामुदायिक हॉल यांसह सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असतील.
सुमारे ४०० कोटींचा खर्च असलेल्या या भव्य प्रकल्पात १,४०० खोल्या बांधण्यात येत असून, देशभरातील ५,००० निराधार वृद्धांना आयुष्यभर मोफत आश्रय देण्याची क्षमता या केंद्रात असणार आहे. गेल्या दहा वर्षांत सद्भावना वृद्धाश्रमाने १ कोटी १० लाखांहून अधिक वृक्ष लावले असून, १५१ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे.
स्थानिक आमदार पराग शहा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रामकथेला दररोज ४०,००० ते ५०,००० भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भाविकांची सोय करण्यासाठी ९५,००० चौ.फुटांचे विशाल पंडाल उभारले जात आहे. मैदानाच्या दुसऱ्या बाजूला ४५,००० भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी विशेष स्वयंपाकघर उभारण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT