मुंबई

मिरा-भाईंदरच्या प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध

CD

भाईंदर, ता. २० (बातमीदार) ः मिरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (ता. २०) प्रसिद्ध करण्यात आल्या. या मतदारयाद्या महापालिकेच्या मुख्यालयातील निवडणूक कार्यालयात सर्वांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मतदार याद्यांवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदारसंघाच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर महापालिकेकडून त्याची फोड करण्यात आली. त्यानंतर २४ प्रभागांसाठी प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. एकूण मतदारांची संख्या आठ लाख १९ हजार १५३ आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या चार लाख ३३ हजार ५५, तर महिला मतदार तीन लाख ८६ हजार ७८ व अन्य २० मतदार आहेत. सर्वात कमी मतदार संख्या उत्तन येथील प्रभाग २४ मध्ये (२५ हजार ८८०), तर सर्वाधिक मतदार मिरा रोडच्या प्रभाग १३ मध्ये (५२ हजार ३८४) आहेत. या मतदार याद्यांवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. त्यांची पडताळणी झाल्यानंतर ५ डिसेंबरला अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

पुरुष मतदार ४,३३,०५५
महिला मतदार ३,८६,०७८
अन्य मतदार २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT