मुंबई

मालवणीत कचरा उलण्याकडे दुर्लक्ष

CD

मालवणीत कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष
मालाड, ता. २० (बातमीदार) ः मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक ७ येथील शौचालयालगत तब्बल पाच ते सहा फूट उंचीचे कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिल्याने परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. प्लॉट क्रमांक ४, नवीन कलेक्टर कंपाउंड येथील शौचालय बांधकामानंतर कंत्राटदाराने डेब्रिज न उचलल्याने या ठिकाणी प्रथम बांधकामाचा मलबा साचला आणि त्यानंतर नागरिकांनी टाकाऊ वस्तू व इतर कचरा टाकण्यास सुरुवात केली. परिणामी आज येथे प्रचंड कचरा साचून गंभीर आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे शौचालयात ये-जा करताना नागरिकांना वाट शोधावी लागत आहे. दुर्गंधी, घाण आणि डासांचे वाढते प्रमाण यामुळे परिसरातील रहिवाशांना जगणे कठीण झाले आहे.
स्थानिक रहिवासी तारीख शेख यांनी पालिकेच्या हेल्पलाइनवर अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या आहेत. परंतु त्यांच्या मते, पालिकेकडून फक्त नाममात्र कचरा उचलण्याचा देखावा केला जात असून, कचऱ्याचा डोंगर मात्र दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT