मुंबई

दिव्यात कचरा प्रश्न पेटला

CD

दिव्यात कचराप्रश्न पेटला
प्रभाग समिती कार्यालयाच्या दारात कचरा फेकत आंदोलन
ठाणे/डोंबिवली ता. २० : दिवा शहरात जागोजागी कचरा साचल्याने आणि वेळेवर उचलला न गेल्याने सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर कचरा समस्येकडे प्रशासनाचे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात भारतीय जनता पार्टी (भाजप) आक्रमक झाली असून, भाजप कार्यकर्त्यांनी दिवा प्रभाग समिती कार्यालयाच्या दारात कचरा फेकून अनोखे आंदोलन केले. कळवा-मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने पालिका मुख्यालयाच्या गेटवर कचरा टाकून आंदोलन केल्यानंतर आता दिव्यातील कचरा कोंडीवरून भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी (ता. २०) भाजपने थेट दिवा प्रभाग समिती कार्यालयाच्या दारात कचरा फेकून तीव्र आंदोलन केले. यामुळे ठाणे पालिका क्षेत्रातील कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे.

दिवा शहर परिसर, स्थानक परिसर आणि दिवा दातीवली रोडवर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा साचलेला कचरा सडून त्याला दुर्गंधी सुटल्यामुळे नागरिकांना नाक दाबून रस्त्यावरून जावे लागत आहे. नागरिकांनी या समस्येबाबत भाजप कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. कचरा समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपने गुरुवारी हे आंदोलन केले. दिवा शहर मंडलाध्यक्ष सचिन भोईर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, भाजपचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंत भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोशन भगत, अंकुश मढवी, प्रवीण पाटील, श्रीराम भगत, विजय वाघ, नितीन कोरगावकर, अनुराज पाटील, कल्पेश सारस्वत, साधना सिंह, पूनम सिंह, प्रवीण महाकाल आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी दिवा विभागातील कचरा स्वतः गोळा करून तो थेट दिवा प्रभाग समितीमधील घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयासमोर टाकून तीव्र निदर्शने केली.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका
आंदोलकांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. नागरिक सतत तक्रारी करत असतानाही महानगरपालिका कुठल्याही पातळीवर गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यांवरील कचरा थेट कार्यालयात आणला, जेणेकरून अधिकारी परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवतील, अशी टीका भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. कचऱ्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत स्वच्छता व्यवस्थेत तत्काळ सुधारणा करण्याची मागणी केली.

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप
आंदोलनादरम्यान सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने आंदोलकांच्या संतापात अधिक भर पडली. पालिका अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्धची नाराजी अधिकच तीव्र झाली.

डायघर प्रकल्पास विरोध
ठाणे महापालिकेने डायघर भागात उभारलेल्या कचरा विल्हेवाट प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत आहे. कचऱ्याची दुर्गंधी आणि इतर कारणांमुळे हा प्रकल्प ठप्प झाला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा प्रकल्प ठप्प झाल्याने कळवा, मुंब्रा, दिवा आणि डायघर भागातील कचरा संकलनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. या सर्वच ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

आंदोलनाची मालिका
राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी कळव्यात साठलेला कचरा एका डम्परमधून आणून थेट पालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टाकला होता. त्यानंतर आता दिवा परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम ठप्प असल्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप

Inspirational Story:'जिद्दीच्या जाेरावर पोलिस हवालदार अमृत खेडकर यांनी केली सायकल रॅली यशस्वी'; १५ दिवसांत ४ हजार २५० किलोमीटर अंतर पूर्ण..

'एकटेपणा प्रचंड त्रास देतो' करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, म्हणाला...'जेवणाच्या वेळी कोणी नसल्याची..'

Gautam Gambhir: सितांशू कोटकचा खुलासा: गौतम गंभीरला दोष देणे चुकीचे, खेळपट्टी आणि फलंदाजीही जबाबदार

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला; हे शेअर्स तोट्यात!

SCROLL FOR NEXT