मुंबई

इंग्रजी शाळांच्या पाट्या झाल्या मराठीत

CD

इंग्रजी शाळांना मराठीचे वावडे
ठाण्यात १५३ शाळांना नोटीस; नामफलक मराठीत न केल्यास मान्यता होणार रद्द
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० ः मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीच्या प्रयत्नांदरम्यान, दुकाने आणि आस्थापनांनंतर आता शाळांचे नामफलकही मराठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे; मात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील १५३ इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अद्यापही शासनाच्या या आदेशाचे पालन केलेले नाही. मराठी नामफलक न बसवणाऱ्या या शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाने पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. आठ दिवसांत नामफलक मराठीत न केल्यास, शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल, असा कठोर इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७६९ शाळा असून, यापैकी ४०१ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. शासनाच्या निर्देशानुसार, या सर्व शाळांना मराठी नामफलक लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी २४८ शाळांनी मराठी नामफलक लावले तर १५३ शाळांनी अद्यापही मराठी नामफलक लावलेले नाहीत. शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ नामफलकच नव्हे, तर पालिका शाळांसह सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील सर्व पत्रव्यवहारदेखील मराठी भाषेतूनच असावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

कडक कारवाईचा इशारा
मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्या उर्वरित १५३ शाळांना शिक्षण विभागाने पुन्हा नोटिसा बजावल्या आहेत. शिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी स्पष्ट केले आहे, की आठ दिवसांत नामफलक मराठीत बसविले नाही तर शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल.
दुकाने आणि महाविद्यालयांनंतर आता शाळा स्तरावरही मराठी भाषेला महत्त्व देण्याचा हा प्रयत्न आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
.................................
जिल्हा प्रशासन गंभीर नाही
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या किती शाळांनी नामफलक मराठीत केले, याबाबत जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांना विचारले असता, जिल्हा परिषदेच्या १,३३१ शाळांचे व मराठी माध्यमांचे फलक मराठी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंग्रजी शाळांच्या नामफलक मराठी करण्याच्या सूचना दिल्या आहेत; पण काही शाळांनी मराठी नामफलक केले याची माहितीच त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंग्रजी शाळांना पुन्हा सूचना देण्यात येतील, असे सांगितले. त्यामुळे मराठी नामफलकाबाबत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bhagoria Festival : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT