मुंबई

पश्चिम रेल्वेची ७ महिन्यांत १२१ कोटींची दंडवसुली

CD

पश्चिम रेल्वेचा
फुकट्यांना दणका
सात महिन्यांत १२१.६७ कोटींची दंडवसुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारून एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत १९ लाख फुकट्यांकडून १२१ कोटी ६७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीपेक्षा ५१ टक्के जास्त वसुली झाली असून, रेल्वे बोर्डाच्या उद्दिष्टापेक्षा १४ टक्के अधिक आहे.
ऑक्टाेबरमध्ये २४ कोटींपेक्षा जास्त दंडवसुली केली असून, मे २०२२ मधील २६ कोटींच्या सर्वोच्च नोंदीनंतर हा दुसरा सर्वोत्तम मासिक विक्रम आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. तपासणी पथकांची संख्या वाढवण्यात आली असून, गाड्या आणि स्थानक परिसरात अचानक तपासणी केली जात आहे.
-----
ऑक्टोबरमध्ये महसुली विक्रम
अक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेने दैनंदिन महसूल मिळवण्यात अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. १७ ऑक्टोबरला पश्चिम रेल्वेने तब्बल एक काेटी ४० लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर १८ ऑक्टोबरला अहमदाबाद विभागाने ३८ लाखांहून अधिक, तर रतलाम विभागाने सुमारे १६ लाखांचा महसूल मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये फेब्रुवारीत हवेची गुणवत्ता खालावली; महाल परिसर सर्वाधिक प्रदूषित

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT